कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली घाटात मद्यधुंद पर्यटक युवकाने केली एसटी चालकाला मारहाण

*🟥आंबोली घाटात मद्यधुंद पर्यटक युवकाने केली एसटी चालकाला मारहाण*

*🟥आज करणार संशयित आरोपीला न्यायालयात हजर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 पतिनिधी : प्रभाकर गावडे*

*🎴 आंबोली, दि.:१३ जुलै*.
आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या बेळगाव येथील मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पर्यटकांकडून सावंतवाडी एसटी आगाराचे चालक विक्रम सुरेश पाटील रा.गडहिंग्लज यांना एसटी बस मधून बाहेर खेचत बेदम मारहाण करण्यात आली.यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार काल संध्याकाळच्या सुमारास आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्या परिसरात घडला. याप्रकरणी चालक विक्रम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेळगाव येथील माझ इलियास गोलंदाज (वय 22) यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी एसटी डेपो ची सावंतवाडी- नृसिंहवाडी ही बस घेऊन चालक विक्रम पाटील हा आंबोली घाटातून जात असताना आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात वाहतूक कोंडीत अडकली असता बेळगाव येथील काही पर्यटकांकडून मद्यधुंद अवस्थेत गाडीवर हाताने मारून आवाज करण्याचे प्रकार सुरु होते . यावेळी काही प्रवाशांनी जाब विचारला असता त्यांचा राग घेऊन माझ या मद्यधुंद युवकाने एसटी बस चालू असताना सुद्धा चालक विक्रम पाटील यांचे दोन्ही पाय खेचून रस्त्यावर पाडले यात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय फॅक्चर झाला आहे. सदर प्रकाराला वेळी प्रसंग दाखवून चालकाने हँड ब्रेक ओढल्याने गाडीवर नियंत्रण मिळवता आले. अन्यथा मागच्या गाडीचा अपघात होऊन मोठा अनर्थ झाला असता.
झालेला प्रकार समजताच घटनास्थळी आंबोली दूरक्षेत्र चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित गोते त्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मद्यधुंद पर्यटकांना ताब्यात घेतले तसेच जखमी एसटी चालकाला उपचाराकरता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. चालक विक्रम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला व सरकारी काम करण्यापासून परावृत्त केल्याप्रकरणी माझ या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या युवकासह त्यांच्यासोबत असलेल्या अन्य काही युवकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे,आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!