आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

२६ ते २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘त्या’साहसी मोहीमे बद्दल आयोजकांनी “गेळे” ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही

सदर मोहीमेदरम्यान अपघात, दुर्घटना घडल्यास त्यास गेळे ग्रामपंचायतचा कोणताही संबंध नाही..अंकुश जाधव ( सरपंच ,गेळे)

कार्यकारी संपादक – आनंद धोंड

सावंतवाडी – तालुक्यातील आंबोली कावळेसाद पॉइंट ( गेळे ) येथे दि. २६ ते २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘त्या’साहसी मोहीमे बद्दल गेळे ग्रामपंचायतने खुलासा केला असून ‘त्या’ साहसी मोहिम राबवण्या करिता आयोजकांनी अद्याप गेळे ग्रामपंचायत जवळ कोणताही रितसर संपर्क अद्याप केलेला नाही. त्यामुळे सदर मोहिमेला आपल्या कडून कोणत्याही प्रकारची मान्यता नसून सदर मोहीमेदरम्यान अपघात, दुर्घटना घडल्यास किंवा नुकसान झाल्यास त्यास गेळे ग्रामपंचायतचा कोणताही संबंध नाही. अशी माहिती प्रसिद्दपत्राद्वारे सरपंच अंकुश कदम यांनी दिली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत गेळे अंतर्गत कावळेसाद पॉइंट येथे कडा, दरीत व आदी परिसरात दि. २५ ते २७ डिसेंबर २०२० रोजी साहसी उपक्रम राबवणार असल्याच्या बातम्या प्रसिद्द झाल्याने सदर बाब आमच्या निदर्शनास आली आहे. परंतु, संबंधित ‘त्या’ आयोजक संस्थेने किंवा व्यक्तींनी कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी किंवा सदर उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी कागदोपत्री गेळे ग्रामपंचायतला दि. २४ डिसेंबर २०२० रोजी पर्यंत कोणताही संपर्क केलेला नाही. त्यामुळे आमचा सबंधित आयोजक असलेले संस्था किंवा व्यक्तींना सदर उपक्रम राबवण्यास आमची कोणतीही अधिकृत मान्यता नाही. त्या कालावधीत काही गैरप्रकार, अपघातसह इतर दुर्घटना घडल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास गेळे ग्रामपंचायतीचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. असे गेळे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच अंकुश कदम यांनी प्रसिद्दपत्राद्वार म्हटले आहे.

तसेच संबंधित आयोजक संस्था किंवा व्यक्ती यांनी रितसर गेळे ग्रामपंचायतला सदर साहसी उपक्रम राबवण्यास शासनाच्या सर्व नियमांनुसार आवश्यक त्या – त्या विभागांच्या परवानगींसह कागदोपत्री आवश्यक बाबी पूर्ण करत असतील तर ‘त्या’ संबंधित गेळे ग्रामपंचात शासनाच्या नियमांनुसार पुढील निर्णय घेईल. अशी देखील सरपंच अंकुश कदम यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे माहीती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!