पायी ये-जा करणारे पादचारी व वाहनचालकांना अडथळा ठरत होती सुतारवाडी परिसरातील झाडी 

 

 

जागरुक व कर्तव्यदक्ष युवकांनी श्रमदानातून झाडी तोडून केला अडथळा दूर

 

मळगांव मधील पादचारी व वाहनचालकांकडून अभिनंदन

 

सावंतवाडी (सुखदेव राऊळ)

 

रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडे आणि झुडपे यामुळे रस्त्याच्या कडेकडेने ये-जा करणारे पादचारी आणि या गर्द झाडी व झुडपांमधील नाग मोडी वळणांच्या रस्त्यावरून भरधाव धावणाऱ्या वाहनांना या झाडा- झुडपांचा मोठा अडथळा निर्माण होतो, मळगांव येथील सुतार वाडी या प्रचंड लोकवस्तीच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात वाढलेली झाडी आणि झुडपे मागील एक महिन्यापासून येथून ये- जा करणारे पादचारी व भरधाव धावणाऱ्या वाहनांच्या वाहन चालकांसाठी प्रचंड अडचण ठरत होती. मात्र याकडे मळगांव ग्रामपंचायत व जि. प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने अपघाताची शक्यता वाढली होती. ही बाब लक्षात घेऊन येथील जागरूक व कर्तव्यदक्ष युवक दर्शन केणी,रंजन केणी,बंटी मेस्त्री,गणेश कानसे, दिलीप कानसे,अण्णा कानसे ,अरुण कानसे,अजित कानसे,गुरू देवळी,मंथन खानोलकर या युवकांनी कोणाची प्रतिक्षा न करता स्वतः पुढाकार घेऊन सोमवारी ही अडचण ठरणारी झाडी व झुडपे हाती पाळ कोयता घेऊन तोडून रस्ता मोकळा केला. याबद्दल त्यांचे मळगांववासियांकडून अभिनंदन होत आहे.

सुतार वाडी हायवे सर्कल पासून नवीन ग्रामपंचायती पर्यत वाढलेली ही झाडी व झुडपे तोडून पुढील अपघात व अनर्थ टाळण्यासाठी पुढे सरसावलेल्या या युवकांचे सुतार वाडी व या मार्गावरुन ये-जा करणारे जोशी वाडी, मांजरेकर वाडी, रेडकर वाडी, पिंपळवाडी, ब्राह्मण पाट तसेच रस्ता वाडी, राणेवाडी, कुंभारवाडी,सुतारवाडी,गावकरवाडी व देऊळ वाडी या परिसरातील पादचारी व वाहन चालक यांच्या कडून कौतुक व आभार व्यक्त केले जात आहेत. सुतार वाडी व राणे वाडी येथील या कर्तव्यदक्ष युवकांनी केलेल्या या कामगिरीमुळे संभाव्य अपघात व दुर्घटना टळल्याच्या प्रतिक्रिया मळगांव ग्रामस्थ पादचारी व वाहनचालक व वाहनधारक यांच्याकडून व्यक्त होत आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!