कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

” बळीराजासाठी एक दिवस ” या उपक्रमंतर्गत मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव या शाळेने ‘ बांधावरची शाळा ‘ हा उपक्रम संपन्न

 

मळगांव येथील शेतकरी सुरेश कानसे यांच्या शेतात घेण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना शेती बद्दलचे धडे

सावंतवाडी ( सुखदेव राऊळ)

” बळीराजासाठी एक दिवस ” या उपक्रमंतर्गत मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव या शाळेने ‘ बांधावरची शाळा ‘ हा उपक्रम मंगळवारी राबविला. मळगांव येथील शेतकरी सुरेश कानसे यांच्या शेतात घेण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना शेती बद्दलचे धडे देण्यात आले.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.देशात निम्म्या पेक्षा जास्त लोक शेती करतात. कोकणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यात कोणत्या प्रकारचे बियाणे वापरावे, त्याची योग्य मशागत, शेतीची अवजारे, खते किटनाशके औषधे आदी गोष्टींची माहिती देण्यात आली. तसेच लावणी करताना ती कशा प्रकारे करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांना बांधावरची शाळा हा एक नवीनच आणि नावीन्यपूर्ण उपक्रम होता.त्यामुळे सगळ्यांनीच याचा मनमुराद आनंद लुटला.
या विशेष कार्यक्रमास मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव चे पर्यवेक्षक श्री. फाले सर, सहा.शिक्षक श्री. कदम सर, तसेच सहा.शिक्षक ठाकरे सर तसेच इयत्ता आठवीचे विद्यार्थी – विद्यार्थिनी वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!