शासकीयसंपादकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज’च्या दणक्याने उत्पादन शुल्क अधिकारी हडबडले..

▪️ हप्ता नको पण कोकण लाईव्ह च्या स़ंपादकांना आवरा म्हणण्याची वेळ..

▪️ दारु ब़ंदी खात्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी जारी केलेत आदेश..

▪️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चा लढा निर्णायक वळणावर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

🎴सावंतवाडी,दि.२७: महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी राज्यातील सर्व दारूबंदी उत्पादन शुल्क अधीक्षकांना आपल्या विभागातील बेकायदेशीर दारू वाहतूक, हातभट्ट्या, उद्ध्वस्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची कार्यवाही संबंधित विभागाने २४ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण करायची आहे.

चोरट्या दारु  वाहतुकीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला यांचा ठपका या आदेशात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या एक महिन्यासाठी रद्द करण्यात आल्या  आहेत. जे अधिकारी सुट्टीवर गेले आहेत, त्यांना त्वरित कामावर हजर होण्याचे आदेश दिल्याने उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हप्ता नको पण कारवाई आवरा असे  म्हणण्याची वेळ आता उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर आली आहे. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने याबाबत सतत आठ दिवस पाठपुरावा केल्यामुळे या लढ्याला यश आले आहे. तशा प्रकारचे पत्र कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ला प्राप्त झाले आहे. सिंधुदुर्गात गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक केली जाते, या दारु वाहतूकीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर होतो. व ही मुले झटपट श्रीमंत होण्याच्या नादात यामध्ये गुंतली जातात व आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात. याविरुद्ध कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने आवाज उठवून लढा उभारला होता. व या सर्व प्रकारात दारूबंदी उत्पादन शुल्क खात्याचे  पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, त्यांचे सर्व कर्मचारी, पंच, सहभागी असल्याने दारू माफिया बोकाळले होते. पैशाच्या जीवावर आपण सर्वच मॅनेज करू शकतो. हा त्यांचा समज आम्ही खोटा ठरविला आहे. दारूबंदी उत्पादन अधिकाऱ्यांना आता हप्ता नको  पण संपादकांना आवरा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अनेकांकडे आमच्या बाबत विचारणा केली. मात्र, ज्या ठिकाणी चौकशी झाली, त्या सर्व लोकांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज’च्या संपादकांवर विश्वास दाखवून ते  तुमच्या आमिषाला बळी पडणार नाहीत. त्यामुळे तुम्ही त्या भानगडीत जाऊ नका. असे समजावले. अखेर कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या  कार्यालयात येण्याचे धाडस ह्या हप्तेखोर अधिकाऱ्यांना झाले नाही. व ते सावंतवाडीत आल्या पावली माघारी फिरले. हीच आम्ही गेल्या तीस वर्षात कमावलेली विश्वासाहर्ता आहे. ती पैशांच्या तुलनेत खूप मोठी आहे.

ज्यांची हप्ता खाऊन खाऊन पोटे सुटली आहेत, संपत्ती मिळविली आहे, ही संपत्ती मिळविण्यासाठी अनेक लोकांचे संसार या दारूमुळे उध्वस्त झाले आहेत. अशा सर्व लोकांचे शिव्या शाप घेऊन हे अधिकारी व त्यांना हप्ता देणारे दारू तस्कर आता टिकाव धरू शकतील हा विषय आहे.

दारू बंदी खात्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी जो आदेश जारी केला आहे, त्यात  राज्यात अवैध दारु वाहतुकीमुळे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. कर बुडाला आहे. लॉक डाऊन कालावधीत अवैध दारू वाहतूक ध़दे, हातभट्टया मोठ्या प्रमाणात फोफावल्या आहेत. त्यामुळे ह्या सर्व दारू धंद्यांवर, वाहतुकीवर कठोर कारवाई करावी व कार्यवाहीचा अहवाल आयुक्त कार्यालयाकडे पाठवावा असे आदेशात म्हटले आहे.

त्यामुळे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना दारू वाहतूक करणाऱ्यांना आम्हाला हप्ता नको परंतु आमच्या वरील कारवाई आवरा त्यासाठी तुमचा करोडो रुपयांचा भाव आम्ही जप्त करतो व तुमच्यावर गुन्हा दाखल करतो. आम्हाला सहकार्य करा एवढे दिवस आम्ही तूम्हाला वाचवले, आता तूम्ही आम्हाला वाचवा.  असे सांगण्याची वेळ आली आहे. व त्यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी वरील कारवाई करण्यासाठी व पुढे धंदा सुरळीत चालण्यासाठी दारू माफियाहि या योजनेला तयार झाल्याचे वृत्त आहे.

शासनाला या एक महिन्याच्या कालावधीत दारूबंदीच्या अनेक केसेस केलेल्या दाखवायच्या आहेत. व आपली कातडी वाचवायची असे धोरण उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांचे असल्याचे समजते. एकंदरीत दारू वाहतूक करणारे दारू तस्कर व त्यांना सहाय्य करणारे खात्यातील सर्व अधिकारी त्यांचे शिपाई, पंच यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चा धसका घेतला असून कोकण लाईव्ह चे संपादक सिताराम गावडे यांना आवरा अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र, आम्ही कोणाच्याही धमकीला कधीही भिक घातली नाही. आम्ही हे कार्य असेच पुढे चालू ठेवणार आहोत. जोपर्यंत सिंधुदुर्गात होणारी दारू तस्करी बंद होत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू ठेवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. आपण जे पाठबळ मला देत आहात त्यामुळे लढायला उर्जा मिळत आहे.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*

🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!