कसाल राष्ट्रीय महामार्गावर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.३०: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कसाल बालवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रॉसिंगजवळ महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार प्रशासनाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ज्या ठिकाणी महामार्गावर अंतर्गत येणारी गावे तसेच वाड्यांमध्ये ये-जा करण्यासाठी क्रॉसिंग ठेवण्यात आले आहे. सध्या सुरक्षेच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

बऱ्याच ठिकाणची कामे अर्धवट स्थितीत आहेत, त्यामुळे वाहनधारकांना क्रॉसिंग, डयव्हर्शन, सर्विस रोड, रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने संभ्रम निर्माण होत आहे. काही ठिकाणी दिशादर्शक फलक, डयव्हर्शन, क्रॉसिंग दर्शवणारे फलक, लावण्यात आल्याने अनेकदा वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागते.

कसाल प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर महामार्गावर क्रॉसिंग ठेवण्यात आली आहे. या ठिकाणाहून एका बाजूला कुंदे, कुसबे, पोखरण, आंब्रड, या गावांकडे व गावातील अन्य वाडी मधील वाहनधारकांचे, नागरिकांना ये-जा करावी लागते. महामार्ग भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे याठिकाणी अंतर्गत वाड्यात मधून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचे नागरिकांना कसरत करावी लागते. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार प्रशासनाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. क्रॉसिंग जवळ दुभाजक दोन्ही बाजूला सिग्नल लावण्यात आले आहेत. हे सिग्नल महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी करण्यास मदत करणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान, कसाल गावातील चौपदरीकरण अंतर्गत बरीच कामे अर्धवट स्थितीत असून ती तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी ग्रामस्थांमधून व वाहन चालकांकडून तसेच पादचाऱ्यांनमधून केली जात आहे.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

