सावंतवाडी पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी श्री.व्ही.एम.नाईक यांचा निगुडे ग्रामपंचायतच्या वतीने व गावातील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला सत्कार
🛑सावंतवाडी पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी श्री.व्ही.एम.नाईक यांचा निगुडे ग्रामपंचायतच्या वतीने व गावातील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला सत्कार
🎥Kokan Live Breaking
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻प्रतिनिधी-प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,६जुन: सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. रविंद्र कणसे यांची गडचिरोलीला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी निगुडे गावचे श्री. व्ही. एम. नाईक यांची नियुक्ती करण्यात आली दिनांक १ जून रोजी त्यांनी सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार त्यांनी घेतला. ही निगुडे गावासाठी आनंदाची बातमी होती त्यानिमित्त निगुडे ग्रामपंचायत व निगुडे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम श्री देवी माऊली मंदिर निगुडे या ठिकाणी करण्यात आला तसेच सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील सेवानिवृत्त माजी मनरेगा नायब तहसीलदार श्री. लक्ष्मण निगुडकर यांचेही ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने सेवानिवृत्ति पर सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर निगुडे गावचे सरपंच श्री. समीर गावडे, उपसरपंच श्री गुरुदास गवंडे, रोणापाल सरपंच श्री. सुरेश गावडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. पी. के. गावडे, निगुडे पोलीस पाटील श्रीम. सुचिता मयेकर, निगुडे माजी सरपंच श्री. शांताराम गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. नाना खडपकर, माजी पोलीस अधिकारी श्री. गणेश गावडे, नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. नारायण राणे, मडुरा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. जी. के. गावडे, निगुडे ग्रामसेविका तनवी गवस, जि. प. माजी मुख्याध्यापक श्री महादेव नाईक, आशासेविका श्रीम. भाग्यलक्ष्मी मोरजकर, निरवडे जि. प. शिक्षक श्री. उद्देश नाईक, एसटी कर्मचारी श्री. बाबली तुळसकर, माजी उपसरपंच श्री. शिवा सावळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजेश मयेकर, श्री .सुरेश रुबजी, श्री .पंढरीनाथ राणे, रास्तधान्य दुकान संचालिका श्रीम. रोहिणी गावडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी निगुडे गावचे सरपंच श्री. समीर गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गटविकास अधिकारी श्री. व्ही. एम. नाईक हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत यापूर्वी ते सहाय्यक गटविकास अधिकारी असताना त्यांनी गावच्या विकासासाठी सतत सहकार्य केलं कोरोना काळातही त्यांनी सावंतवाडीत यशस्वी कामगिरी केली नेहमी हसत आणि सतत कामात झोकून देत त्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोचतील या संदर्भात आम्हांला सातत्याने सन्माननीय सरपंच व ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करीत आज त्यांची सावंतवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी बढती झाली ही निगुडे गावासाठी आनंदाची बातमी आहे आणि आज आम्हांला त्यांचा सत्कार करण्याकरता मिळाला हे आमचे भाग्य समजतो असे ते म्हणाले. तसेच रोणापाल सरपंच श्री. सुरेश गावडे यांनी गटविकास अधिकारी श्री. व्ही. एम. नाईक व सेवानिवृत्त श्री. लक्ष्मण निगुडकर यांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की साहेब निगुडे गावावर ज्याप्रमाणे आपलं प्रेम आहे त्याच प्रमाणे शेजारी रोणापाल गाव आहे त्यामुळे आमच्या वरी लक्ष द्या आणि आम्हालाही विकासाबाबत विसरू नका आमचाही गाव चांगल्या पद्धतीने आराखड्यामध्ये समाविष्ट करा अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री. पी. के. गावडे यांनी दोघांनाही शुभेच्छा देत माझ्या समवेत श्री. व्ही. एम. नाईक यांनी काम केले आणि असा गटविकास अधिकारी सावंतवाडी तालुक्यात आमच्या गावाचा लाभला ही ही बाब खूपच कौतुकास्पद आहे या गावच्या लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की कुठचेही काम हे नुसते मिळत नाही तर त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो आणि तो आपण करावा आपला गाव विकासाच्या प्रगतीवर कसा नेता येईल हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. यावेळी सत्कार मूर्ती मनरेगा माजी नायब तहसीलदार सेवानिवृत्त श्री. लक्ष्मण निगुडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि निगुडे सारख्या एका छोट्या गावातून मी आज पर्यंत येथे पोचलो गेली ३० वर्षे महसूल मध्ये प्रामाणिकपणे सेवा दिली व शासनाची सेवा करून झाली आता यापुढे गावच्या जनतेने मला गावची सेवा करण्याची संधी द्यावी अशी हाक त्यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना दिली. *सत्कारमूर्ती गटविकास अधिकारी श्री व्ही. एम. नाईक बोलताना म्हणाले की मी सर्वसामान्य गरीब घराण्यातून आलेला व्यक्ती सन १९८० साली पाल पुनर्वसन मधून स्थलांतर झाल्यानंतर आम्ही निगुडे गावात आलो विस्तार अधिकारी नंतर सहाय्यक गटविकास अधिकारी आणि आता गटविकास अधिकारी वर्ग १ एवढा मोठा मान पद हे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईने मला मिळाले निगुडे गावात आम्ही आलो तेव्हा मी ग्रामविस्तार अधिकारी झालो माझ्या वडिलांची इच्छा होती कि मी गटविकास अधिकारी व्हावे आज ते हयात असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता माझे सर्व नाईक कुटुंब आम्ही निगुडे गावात आल्यानंतर मोठमोठ्या पदावर आलोत हे या ग्रामदैवत श्री देवी माऊली आणि तुम्हाला ग्रामस्थांच्या आशीर्वादामुळेच माझे चुलत बंधू तहसीलदार, आर्मी मध्ये मेजर झाले मी आपल्याला आश्वासन देतो की गावचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल यादृष्टीने माझे प्रयत्न राहतील आपण सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी माझा सत्कार समारंभ कार्यक्रम केला हे मी कधीही न विसरणारा षण आहे अनेकांनी मला मुख्य कार्यकारी अधिकारी व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्यात तुमची तीही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे कारण निगुडे गावामधून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत व्यक्ती गेल्या आहेत त्यामुळे हे विसरून चालणार नाही असे ते म्हणाले.
यावेळी निगुडे गावचे माजी सरपंच श्री. शांताराम गावडे सर, पोलीस पाटील श्रीमती सुचिता मयेकर, जि. प. निरवडे शाळेचे शिक्षक उद्देश नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केले तर आभार माजी सरपंच श्री. शांताराम गावडे सर यांनी ग्रामस्थांच्या वतीने मानले यावेळी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
====================
*सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, मध्ये “सोने तारण कर्ज योजना ( ८% ) व्याज दराने सुरू*
*चला तर मग आताच*…
*🏢अधिक माहिती साठी त्वरित खालील शाखेंशी संपर्क साधा..*
*सावंतवाडी प्रधान कार्यालय*
*📱9404925490*
*सावंतवाडी शहर विभाग – पाटेश्वर कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404924269*
*बांदा – राजगुरु कॉम्प्लेक्स, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923360*
*कोलगांव – कोलगांव ग्रा.पं. जवळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404925127*
*आंबोली – आंबोली बाजारपेठ, एस.टी. स्टॅण्डच्या बाजूला, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404925157*
*कलंबिस्त – सैनिक भुवन, मु. पो. कलंबिस्त, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923245*
*कणकवली – मसुरकर बिल्डींग, बाजारपेठ, कणकवली*
*📱9404923859*
*कणकवली – कनकनगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923782*
*कनेडी – कारेकर बिल्डींग, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923733*
*कुडाळ – एस. टी. स्टैंड समोर, सेंट्रल बँकेच्या वर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923554*
*माणगांव – माणगांव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923574*
*कसाल- पोलिस स्टेशन समोर, कसाल बाजारपेठ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923626*
*मालवण – कट्टा बाजारपेठ, मु.पो. कट्टा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923687*
*मालवण – मामा वरेरकर नाट्यगृहासमोर, मालवण, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404925733*
*पोईप – बाजार पेठ पोईप तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग*
*📱9404925411*
*वेंगुर्ले – गावडेश्वर मंदिरासमोर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923391*
*होडावडा – होडावडा बाजारपेठ, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404923370*
*म्हापण – बाजारपेठ म्हापण, ता.1 वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404923524*
*शिरगांव – शिरगांव बाजारपेठ, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग*
*📱9404924259*
*वैभववाडी – श्रीकृष्ण निवास, लोके बिल्डींग, ता. वैभववा जि. सिंधुदुर्ग.*
*📱9404924077
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_