कणकलीत केटी बंधाऱ्यावरुन खाली पढून दोन दुचाकी चा अपघात
कणकलीत केटी बंधाऱ्यावरुन खाली पढून दोन दुचाकी चा अपघादोन युवती पडल्या २० फूट खोल नदीत;जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
कणकवली, दि.३०:- शहरात मराठा मंडळ नजीक नदीवर असलेल्या केटी बंधाऱ्यावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने दुचाकीवरील दोन युवती नदीत कोसळण्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यापूर्वीदेखील वागदे येथील युवक याच केटीबंधार्यावरून थेट दुचाकीसह नदीत पडला होता. त्यानंतर पुन्हा महिन्याभरात ही दुसरी घटना घडल्याने केटी बंधार्यावरील वाहतुकीचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान याबाबत उपलब्ध माहितीनुसार सदर युवती या दुचाकीवरुन जात असताना दुचाकी समोरासमोर येऊन आदळल्याने दोन्ही युवती नदीत कोसळल्या. यातील एक केटी बंधाऱ्याच्या पीलरवर अडकली तर दुसरी थेट नदीत कोसळली. मात्र दोन दिवस पावसाने उसंत घेतल्याने नदीला मोठे पाणी नसल्यामुळे सुदैवाने ती युवती बचावली. घटनेनंतर तातडीने तेथील नागरिकांनी प्रसंगावधान राखत दोन्ही युवतींना नदीपात्रात बाहेर काढले. यात एकीला दुखापत झाली असून तिच्यावर उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपचार सुरू आहेत.यातील एका युवतीच्या डोक्याला दुखापत झाली असून तिच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.