आपत्कालीनकोकण

इन्सुली घाटीत इनोव्हा कार आणि शिवशाही बस मध्ये अपघात

इन्सुली घाटीत सांगलीहून गोव्यात जाणार्‍या पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. बांद्याहून सावंतवाडीकडे जाणार्‍या शिवशाही बस व कार यांच्यात समोरासमोर अपघात होऊन कार चालक जखमी झाला आहे. इन्सुलीच्या उत्कर्ष मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदतकार्य केले. पोलीस मात्र घटनास्थळी पोचले नव्हते. अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!