कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीयसामाजिक

दुबईमध्ये मोठे उद्योजक म्हणून नावलौकिक असूनही बशीरभाईंची सामाजिक बांधिलकी कोकणच्या मातीशी आहे : आ.भास्करशेठ जाधव

🟥दुबईमध्ये मोठे उद्योजक म्हंणून नावलौकिक असूनही बशीरभाईंची सामाजिक बांधिलकी कोकणच्या मातीशी आहे : आ .भास्करशेठ जाधव

🟥बशीरभाई हजवानी फाऊंडेशन च्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

▪️अँबुलन्स कमिटीच्या वतीने कोहिनुर ए-कोकण पुरस्काराने हजवानी सन्मानित

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,२३मे: आखाती देश दुबई मध्ये आपल्या कोकणच्या सुपुत्राने नावलौकिक मिळविले आहे.जरी ते दुबई मध्ये प्रतिष्ठित उद्योगपती असले तरी त्यांची नाळ कोकणच्या मातीशी जोडली गेली आहे.बशीरभाईंची सामाजिक बांधिलकी आपल्या मूळ गाव खेड कोकणशी आहे आपल्या मातीशी आहे आपल्या जिवाभावाच्या माणसांजवळ आहे आपल्या मातीशी त्यांनी घट्ट नातं ठेवलं आहे.अशा शब्दात माजी मंत्री आ.भास्करराव जाधव यांनी दुबई मधील प्रतिष्ठित उद्योजक तथा बशीरभाई फाउंडेशनचे प्रमुख बशीरभाई हजवाणी यांचे स्तुती सुमनाने कौतुक केले.

बशीर एम हजवानी फाऊंडेशन चे प्रमुख बशीरभाई हाजवानी यांच्या वतीने चिपळूण अँबुलन्स कमिटी ला शुक्रवारी सायंकाळी कार्डिग्राम अँबुलन्स देण्यात आली अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थिती मध्ये पेठमाप येथील मनाहील हाईटस येथे मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न झाला.माजी पालकमंत्री आ.भास्करराव जाधव,आ.शेखर निकम,बशीरभाई हाजवानी, मुस्लिम समाज अध्यक्ष सलीम कास्कर,बशीरभाई हजवानी यांचे जिवाभावाचे मित्र आमिर हाजवानी, आमदार नसीम खान यांचे स्वीय सहाय्यक खलील खोत ,माजी जि.प अध्यक्ष विक्रांत जाधव,उद्योजक नासिर खोत,इब्राहिम दलवाई,माजी सभापती शौकत मुकादम,वैद्यकीय अधीक्षक रघुनाथ भोई,तालुका आरोग्य अधिकारी जोती यादव,डॉ .यतीन जाधव,अँम्ब्युलन्स कमिटी अध्यक्ष यासिन दळवी माजी नगराध्यक्षा कमिटी उपाध्यक्षा रेहाना बिजले,उपाध्यक्ष नसीम अफवारे,सचिव डॉ.नियाज पाते,खजिनदार राऊफ वांगडे,अली कौचाली खेड चे माजी सभापती सिकंदर जसनाईक,सामाजिक कार्यकर्ते हानिफ घनसार,आरिफ मुल्लाजी,जलाल कादरी,इम्रान कोंडकरी,फैय्याज देसाई,खालिद चोगले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मौलाना हाफिज परकार यांनी केलेल्या कुराण आणि नान पठाणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली,चिपळूण अँम्ब्युलंस कमिटीच्या वतीने कोहिनुर ए-कोकण पुरस्कार देऊन बशीरभाई हाजवानी यांना सन्मानित करण्यात आले.कोकणातील दानशूर व्यक्तिमत्व तथा आखाती देश दुबई मधील प्रसिद्ध उद्योगपती बशीरभाई हजवानी यांच्या वतीने महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात गरजर्वंतांपर्यत मदतकार्य सुरू असते शासनाच्या मदतीची वाट न पाहता कोकणात ज्या ज्या वेळी विविध संकट असो त्या त्या वेळी सर्वात आधी बशीरभाई हाजवाणी आपली टीम घेऊन पोहचले आहेत निसर्ग चक्री वादळ,महापूर संकट,कोरोना काळ,नेसर्गिक आपत्ती,वादळवार अशा अनेक संकट काळात जेएमबीआर ग्रुप आणि बशीर एम हजवानी फाउंडेशनचे मदतकार्य लक्षवेधी ठरले आहे.समाज मंदिर,विविध स्पर्धा ,शैक्षणिक मदत या मधेही त्यांचे मौलाचे कार्य असते कोकणात जुलै २०२१ रोजी आलेल्या महाप्रलंयकारी महापूर संकट काळात येथे रुग्णवाहिका आणि रेस्क्यू टीम ची गरज आहे हे लक्षात घेऊन बशीरभाई हजवानी यांनी रायगड,रत्नागिरी जिल्हयात सुमारे बारा हुन अधिक रुग्णवाहिका प्रत्येक तालुक्यात दिल्या नोव्हेंबरमध्ये याचा लोकार्पण सोहळा दिगग्ज मान्यवरांच्या शुभहस्ते महाड येथे संपन्न झाला. अंबुलन्स कमिटीचे अध्यक्ष यासिन दळवी आणि उपाध्यक्षा माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले यांच्या सुरवाती पासूनच्या मागणीवरून व सततच्या पाठपुराव्या मुळे चिपळूण अंबुलन्स कमिटीला सुमारे ३७ लाखाची पूर्णपणे अद्यायावत अशी कारडिओग्राम रुग्णवाहिका देण्यात आली आहे.
दुबई मध्ये जाण्याचा मला योग आला दुबई विमानतळावर उतरल्यावर रोल्सरोवर अलिशान गाडी आम्हाला न्यायला आली सोबत बशीरभाई स्वतः आणि असंख्य कार्यकर्ते होते या वेळी ही गाडी माझ्या रत्नागिरी जिल्हयातील सुपुत्राची होती याचा मला अभिमान वाटला ,दुबई मध्ये जाऊन गल्फ कंट्रीचा विश्वास बशीरभाईंनी किती मोठ्या प्रमाणात संपादन केला आहे याची जाणीव आम्हाला या वेळी झाली असे आ.भास्करराव जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले.बशीरभाई हाजवानी यांनी दिलेली रुग्णवाहिका चांगल्या प्रकारे रस्त्यावर फिरली पाहिजे असे वाटत असेल तर सुरवातीपासून कठोर रहा गाडीचा मेंटन्स,टायर खर्च,ड्राईव्हर पगार,इंधन या करिता पैसे लागणार आहेत हा खर्च संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून घेतला तरच ते परवडणारे आहे. अँम्ब्युलन्स चालवण्याची क्षमता आणि शिस्त कमिटीकडे असली पाहिजे असे आ.जाधव म्हणाले.
भेटायला आलेल्या प्रत्येकाला मानसन्मान देणे त्याच्या अडचणी समजावून घेणे ही बशीरभाईंची खासियत आहे,महापूर ,कोरोना संक्रमण काळ या वेळी बशीरभाई मदतीसाठी स्वतः सर्वत्र पोहचत होते बशीरभाईंचे कार्य कौतुकास्पद आहे .त्यांनी हाती घेतलेले समाजसेवेचे कार्य त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश देणारे ठरो बशीरभाईंचा पाहुणचार लक्षात राहणार असतो अशा शब्दात आमदार शेखर निकम यांनी आपल्या भाषणात शुभेच्छा देतांना कार्याचे कौतुक केले.अँम्ब्युलन्स मधून पैसे कमवायचे नाही आहेत तर माणसाच्या उपकाराला येऊन पुण्याई मिळवायची आहे माझ्या आयुश्यात मी माणसे कमावली यातच माझे समाधान आहे माणसांच्या सेवेतून ईश्वराची सेवा घडत असते असे मानून मी काम करीत असतो असे बशीरभाई हाजवानी यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले .यासीन दळवी (अध्यक्ष) नाझीम अफवारे (उपाध्यक्ष)
रिहाना बिजले (उपाध्यक्षा) डॉ. नियाज पाते (सचिव) रऊफ वांगडे (खजिनदार) फैयाज देसाई
गणी मुल्लाजी इब्राहिम खान
सज्जाद काद्री
शब्बीर राजिवटे , जफर कटमाले
अल्ताफ नाईक .इब्राहिम दादरकर
नसरीन खडस या चिपळूण अँब्युलन्स कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लोकार्पण सोहळा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.खालिद परकार,माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा,माजी नगरसेवक फैसल कास्कार,अँड.आसिफ अन्सारी,फैरोजा मोडक, सफा गोठे,करामत मिठागरी,रुकसार अलवि,सामाजिक कार्यकर्ते जफर कटमाले,अनस पोत्रीक,श्रीराज हाजवानी, आखलाक हाजवानी, गोउस हाजवानी, शौकत खतीब,बिलाल ममतुले,नौशाद तांबे, अस्लम हजवाणी,शब्बीर खतीब,लियाकत खतीब,महंमद दळवी,इब्राहिम सरगुरोह, अब्दुल सैन,फैरोजा तसबी,फिदा तसबी,सादिक रुमाणे, इम्रान खतीब,बरकत पाते,गुलजार कुरवले, अल्ताफ नाईक,कमालुद्दीन बंदरकर,अजमल दलवाई,आसिफ हंमदूले,इकबाल मुकादम,सईदा शेखवारे,इब्राहिम दादरकर,गणी मुल्लाजी,इब्राहिम खान,शबीर राजीवटे,नसरीन खडस,आरिफ काद्री,सज्जाद काद्री, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाच्या शेवटी फैयाज देसाई यांनी उस्थितांचे आभार मानले,संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले.

———————————————————–
*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*
*https://youtu.be/3a1swis3W1E*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*
❌ *ऑपरेशन टाळा* ❌

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
♦️ *लाखो समाधानी पेशंट*

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*
https://bit.ly/3pygYsU

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*
9145229999 / 9145339999

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*
*फक्त एक महिन्यात*
📍 *लवणोत्तम्म चुर्ण*
https://bit.ly/3LPKlPj

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*
*फक्त एक महिन्यात*
📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*
🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!