सावंतवाडी कळसुलकर इंग्लिश स्कूल च्या सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन ची बैठक संपन्न..

🟥सावंतवाडी कळसुलकर इंग्लिश स्कूल च्या सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन ची बैठक संपन्न..

🟥सिंधुदुर्ग जिल्हात कबड्डीला गतवैभव निर्माण करून देण्याचा मानस.. वसंत केसरकर

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,२३ मे: सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे संस्थापक सदस्य वसंत केसरकर यांना जिवंतपणीच मयत दाखवून सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची मंजुरी घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील कबड्डी प्रेमींनी आज बैठक घेऊन या घटनेचा समाचार घेत कबड्डी फेडरेशन मध्ये भानगडी करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी म्हणून प्रयत्न करण्याचे ठरविले तसेच कबड्डीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन चे संस्थापक सदस्य वसंत केसरकर यांना जिवंतपणी मयत दाखवण्यात आल्या प्रकरणी पोलीस ठाणे, धर्मादाय आयुक्त आदींकडे तक्रारी करण्यात आल्या असून राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही लक्ष वेधण्यात आले असल्याचे यावेळी वसंत केसरकर यांनी सांगितले.
आज वसंत केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी काका कुडाळकर, नंदन वेंगुर्लेकर, अन्वर खान, प्रसाद अरविंदेकर, जावेद शेख, अनिल हळदिवे, महेश कांडरकर, जितेंद्र म्हापसेकर, विकी केरकर, दीनानाथ बांदेकर, सुनील सावंत, सुनील तळेकर, विनायक पराडकर, महेश सावळ, विजय देसाई, दत्ताराम कल्याणकर, संदीप केसरकर, सुभाष कदम, महेश सावंत, तात्या सावंत असे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कबड्डीला गत वैभव निर्माण करून देतानाच कबड्डी फेडरेशन मध्ये भानगडी करणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी म्हणून प्रयत्न करण्यात येतील तसेच कबड्डी हवी, की नोकरी हवी असा प्रश्नही वसंत केसरकर यांनी संबंधितांना विचारला आहे.
यावेळी अनिल हळदिवे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कबड्डी फेडरेशन मध्ये गेल्या ३५ वर्षापासून आपण कार्यरत आहे. विद्यार्थीदशेत आपल्यावर अन्याय झाला त्यानंतर आपण एक मंडळी स्थापन केले आणि त्या माध्यमातून अनेक कबड्डीपटू निर्माण केले. कबड्डी खेळाची प्रगती व्हायची असेल तर राजकीय विरहित पदाधिकारी पाहिजेत. कबड्डी मध्ये राजकीय पदाधिकारी आले की त्यामध्ये राजकारण होते याकडे आपण लक्ष वेधले होते.
यावेळी सुनील सावंत यांनी आपल्या मुलीवर कबड्डी खेळामध्ये यश मिळत असतानाच झालेल्या अन्यायाची कथा सांगितली. यावेळी जितेंद्र म्हापसेकर म्हणाले, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनला राज्य असोसिएशनची मान्यता आहे त्यामुळे ही दडपशाही सुरू आहे. कबड्डी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक भानगडी केल्या आहेत .मात्र आपण यापुढे मुला-मुलींचे दोन व्यवसायिक संघ निर्माण करून व्यावसायिक कबड्डीच्या दृष्टीने जिल्ह्याचे राज्यात नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कबड्डी फेडरेशनचे काम घटनेप्रमाणे चालले नसल्याने हा गोंधळ झाला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर म्हणाले ,आपण खेळाडू होतो. मात्र राजकारणात गेल्यानंतर खेळात राजकारण नको म्हणून बाजूला गेलो.जेष्ठ वसंत केसरकर यांना जिवंतपणी मयत दाखवण्याचा प्रताप पाहून आपल्याला धक्काच बसला त्यामुळे कबड्डी फेडरेशन मध्ये निकोप स्पर्धा व्हायला हवी असे आपल्याला वाटले. अन्यायाच्या विरोधात लढा देण्याची तयारी केली पाहिजे.

यावेळी नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि कबड्डी फेडरेशन अशा संस्था असल्या तरी कबड्डी फेडरेशन मध्ये घातलेल्या गोंधळ समोर आला आहे जिल्ह्याच्या संघातून परजिल्ह्यातील खेळाडूंना खेळवत पुरस्कार प्राप्त केले आहेत हा सगळा गोंधळ पाहता कबड्डी फेडरेशन लागत वैभव निर्माण होणार नाही म्हणून गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करूया. वसंत केसरकर यांना जिवंतपणी मयत दाखवणाऱ्या संबंधितांच्या विरोधामध्ये तक्रार करूनही पोलिसांनी दखल घेतली नसल्याने पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक यांना भेटून त्यांचे पुन्हा एकदा लक्ष्य वेधूया, कोल्हापूर धर्मदाय आयुक्तांकडे खटला न्याय प्रतीक्षेत आहेत तो लढू व राज्य असोसिएशनचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून फेडरेशनची मान्यता रद्द करून ती सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशनला मिळावी म्हणून प्रयत्न करूया.
यावेळी जिवंतपणी आपणास मयत दाखविल्याने धक्का बसला असे ७८ वर्षीय वसंत केसरकर म्हणाले. ते म्हणाले, आपण या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमताने मला मयत दाखविले. याप्रकरणी कोल्हापूर धर्मादाय आयुक्त आणि सिंधुदुर्ग पोलिसांकडून न्याय अपेक्षित आहे. आपण आता गप्प बसणार नाही. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे सदस्य आमदार दीपक केसरकर, माजी आमदार अजित गोगटे यांच्यापासून जिल्ह्यातील मान्यवरांना या घटनेची सखोल माहिती दिली आहे माझे निधन दाखवून ठराव केला आहे त्यामुळे शंभर अपराध भरल्याचे पुरावे ठरले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचे तसेच गजानन कीर्तिकर आदींचे लक्ष वेधले आहे. सिंधुदुर्ग कबड्डीला वैभव प्राप्त करून विद्यार्थ्यांना राज्यपातळीवर खेळाडू तयार व्हावेत म्हणून प्रयत्न केला पाहिजे.
यावेळी विकास केरकर यांनी स्वागत व आभार मानले.

———————————————
*🔌श्री माऊली इलेक्ट्रिकल्स💡*

*▪️Sale & Service🔋💡🔦🔌*

*🏡आमच्या येथे सर्व इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून मिळतील.
🔌💡🔦🔋📺📟
तसेच इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे योग्य दरात स्विकारली जातील.

*⚫आमचा पत्ता -* पावस्कर कुरीयर सर्व्हिस जवळ, गांधी चौक बांदा

संपर्क-📱 *९८२३०३६७८२*

*प्रोप्रा.-तुषार कानसे* इन्सुली
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!