गांजा प्रकरणी आमदार, खासदार, नगराध्यक्ष, पालक मंत्री, विरोधी पक्ष गप्प का?
*🛑गांजा प्रकरणाची पाळेमुळे पोहचली तरी कुठपर्यंत*
*🛑कोणी कोणी खाल्ले प्रेताच्या टाळूवरील लोणी*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- :-३० जुलै*
उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार,उध्दवा अजब तुझे सरकार, लबाड जोडती ईमले माया, गुणवंतांना मात्र झोपड्या ,पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, अजब तुझे सरकार, या अभंगाची आठवण सध्या सावंतवाडीत गाजत असलेल्या गांजा प्रकरणी झाली.एरव्ही एखादा मुद्दा मिळाला कि सत्ताधारी पक्षांवर तूटून पडणारे विरोधी पक्ष या गांजा प्रकरणी कुठच्या बिळात जाऊन लपले हे समजेनासे झाले आहे, तर सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार ,पालकमंत्री, नगराध्यक्ष, मूग गिळून गप्प आहेत जणूकाही आम्हाला काहीच पडले नाही व काहीच घडले नाही,आज युवा पिढी आपले आयुष्य बरबाद करून घेत आहेत ,त्याचे सोयरसुतक या नेतेमंडळींना नाही ,फक्त निवडणुका आल्या की पैसा फेको तमाशा देखो अशी मोहीम राबवून आपले इच्छित साध्य करून घ्यायचे व नंतर या मंडळींना पुन्हा वाऱ्यावर सोडायचे हेच धोरण आजपर्यंत सर्वच पक्षातील राजकीय नेते मंडळींचे आहे.
आपल्या सोबत काम करणारा कार्यकर्ता कोणत्या प्रकारे आयुष्य जगतोय याचे सिंहावलोकन या मंडळींनी कधीच केले नाही, किंबहुना युवापिढी व्यसनाकडे कशी वळेल व आपल्याला त्यांचा वापर कसा करुन घेता येईल याकडेच राजकीय मंडळींचा कल असतो, सावंतवाडीत तीन किलो गांजा पकडला जातो त्यामध्ये अठरा ते वीस वर्षीय युवक सामील असल्याचे तपासात निष्पन्न होते तर ४० ते ५० जणांची यादी तयार होते ,मात्र या गांजा प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याचे सोडून या तपासाची फाईल बंद करण्याचा प्रयत्न पोलिस यंत्रणेकडून केला जात आहे असा आमचा आरोप आहे. आमची एकच मागणी होती या विषारी विळख्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला सोडवा ,मात्र त्याकडे कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्याने पाहिलेली दिसत नाही, जोपर्यंत या गांजाचे लोण आपल्या घरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत यांना जाग येणार नाही, मात्र ज्यावेळी हा गांजा यांच्या घरापर्यंत पोहोचेल त्यावेळी त्याची भीषणता निश्चितच त्यांच्या लक्षात येईल व त्यावेळी वेळ निघून गेलेला असेल.
सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शैक्षणिक व आध्यात्मिक वारसा लाभलेल्या शहरात अशा प्रकारचे कृत्य घडणे हे लांच्छनास्पद आहे त्यामुळे या गांजा प्रकरणाची पाळेमुळे शोधून त्याच्या म्होरक्या पर्यंत पोहोचणे गरजेचे होते, मात्र या गांजा प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वजनदार पदाधिकारी अडकलेले असल्यामुळे कोणताही राजकीय पक्ष पुढे यायला बघत नाही हीच खरी शोकांतिका आहे,या गांजा प्रकरणातील राजकारण सोडले तर पोलीस यंत्रणेने निपक्षपाती तपास करणे गरजेचे होते, असे आमचे मत आहे, शिवाय या गांज्याचा तपास नार्को तपासणी यंत्रणेकडे हस्तांतरित करणे गरजेचे होते, मात्र या प्रकरणात पोलिसांनी अशी कोणतीही भूमिका घेतली नाही याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
आमचे तपास करणाऱ्या यंत्रणेला एवढेच सांगणे आहे, तुम्ही लक्ष्मीच्या मागे न धावता प्रामाणिकपणे काम करा, लक्ष्मी तुमच्याकडे वास करेल, मात्र प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार कोण करत असेल तर हीच लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाऊन तुमच्या घरात कधी अवदसा प्रवेश करेल हे समजणार सुध्दा नाही, म्हणजेच आज ना उद्या या तपासाचे मोजमाप केले जाईल व त्याचा फटका तुम्हाला निश्चितच बसेल.
शहरातील चाळीस-पन्नास युवक या गांजा प्रकरणात सहभागी असल्याची माहिती मिळते ,तपास त्या दिशेने चालू असल्याची माहिती उपलब्ध होते ,मात्र अचानक तो तपास थांबवला जातो, यामागचे रहस्य काय हे अद्यापही कळले नाही, मंत्री ,संत्री ,येतील, जातील, मात्र तपासी अधिकारी शासनाचे प्रतिनिधी हे इथे ना तिथे असतील,हे संबंधितांनी लक्षात ठेवावे, आपल्या कार्यकर्त्यांना वाचण्यासाठी पोलीस यंत्रणेवर वरिष्ठांकडून दबाव येत असला तरी हा दबाव झुगारून निपक्षपातीपणे पोलिस यंत्रणेकडून ज्ञतपास होणे गरजेचे आहे, गेल्या चार दिवसात असा तपास होऊन गांजा तत्सम अमली पदार्थ पुरवणारा व्यक्ती कोण? तो कुठून येतो? तो कोणा मार्फत वितरीत केला जातो? हे शोधून काढून संबंधितांवर कारवाई केली असती तर पोलीस यंत्रणेला लाखो लोकांचे आशीर्वाद मिळाले असते,मात्र गांडूळा सारखी नशा निर्माण करणारा हा गांजा तपासी अधिकाऱ्यांना सुद्धा गांडूळ बनू पाहतो की काय असा संशय निर्माण झाला आहे.
या गाजा प्रकरणाची सखोल चौकशी होऊन गांजा पुरवणाऱ्या मुख्य आरोपींपर्यंत पोलीस जो पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा सामूहिक उठाव केला जाईल हे या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो, कारण एकच ही एक समाजाला लागलेली कीड आहे, तिच्यावर वेळीच उपचार केला तर ती आटोक्यात येईल ,एकदा काय ती पसरली संपूर्ण समाजाला पोखरून टाकेल, त्यामुळे आताच काळजी घेणे क्रमप्राप्त ठरले आहे, याप्रकरणी कोणी किती पैसे खाल्ले याचे मोजमाप करण्यापेक्षा कोणी कसा तपास केला याचे मोजमाप करून तपास अधिकाऱ्यांनी जनतेचे आशीर्वाद घ्यावेत असे आमचे मत आहे, या गांजा प्रकरणाची येत्या दहा दिवसात योग्य ती कार्यवाही करुन त्याच्या म्होरक्याच्या मुसक्या पोलिसांनी न आवळल्यास विविध सामाजिक संस्थांना घेऊन १५ ऑगस्ट रोजी पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर धरणे धरले जाईल याचीही नोंद घ्यावी.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🧎🏃♂️💪🏻आपले आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवाल??आपण कसे निरोगी राहाल???कोरोना काळात कशी स्वतःची काळजी घ्याल??…सर्वाची उत्तरे आम्ही देणार…💪🏻🏃♂️🧎*_
*▪️दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आरोग्याविषयी अमूल्य आणि मोफत मार्गदर्शन…*
♦️ *आहाराच्या माध्यमातून आरोग्याच्या तक्रारी कशा कमी कराव्यात?*
♦️ *शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची कमी कशी भरून काढावी?*
♦️ *आपल्या उंची नुसार आपले वजन कसे वाढवावे अथवा कमी करावे?*
♦️ *शरीरातील चरबी मुळापासून कशी नष्ट करावी?*
♦️ *लहान मुलांचे आरोग्य कसे जपावे?*
♦️ *केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या आरोग्य कसे चांगले ठेवावे?*
👉🏻 *अश्या अनेक विषयांवर मोफत मार्गदर्शन…*
*===========================*
*फक्त खालील लिंकवर एक क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा !*
https://chat.whatsapp.com/LRWSOjnLutdCsO3banf632
संपर्क:-7887880208
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*