चिपळूणमध्ये डॉ .श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरात श्री सदस्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
🟥चिपळूणमध्ये डॉ .श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरात श्री सदस्यांचा उस्फूर्त प्रतिसाद
🟥दापोली मधील अंध श्री सदस्य विजय गौरत यांनी रक्तदान करुन समाजात केला निर्माण केला आदर्श
▪️माजी मंत्री आ.भास्करराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,२०मे: डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने समाज उपयोगी अनेक उपक्रम राबविले जातात याचा प्रत्यक्ष पणे मी अनुभव घेतला आहे.२२ आणि २३ जुलै रोजी आलेल्या महाप्रलयकारी पुरात मलमत्तेचे मोठे नुकसान झाले,जीवित हानि टळली सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते अशा वेळी प्रतिष्ठानने चिपळूण,खेड, महाड़ संपूर्ण कोकणात सर्वात प्रथम अतिशय नियोजन स्वछता मोहिम राबविली जिथे सामाजिक सेवा करायची आहे,जिथे जिथे स्वछतेची गरज आहे,जिथे समाज प्रबोधनाची गरज आहे,जिथे जिथे सामाजिक सलोखा निर्माण करायचा आहे.तिथे आपण सर्वजण श्री सदस्य अत्यंत तळमळीने सेवाकार्य करीत असता आजच्या या रक्तदान शिबिरातून संकलित होणारे रक्त अत्यंत गरजवंता पर्यत पोहचेल असे सांगून श्री सदस्यानी आज रक्तदान शिबीरचा हाती घेतलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा शब्दात माजी मंत्री.आमदार भास्करराव जाधव यानी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
जेष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भुषण तीर्थरूप . डॉ . श्री . नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दीनिमित्त व जेष्ठ निरूपणकार पदमश्री डॉ . श्री . आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वाढदिवसानिमित्त डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता . अलिबाग जि . रायगड यांचेवतीने श्री सदस्यांचे मार्फत चिपळूण येथे काल बुधवारी १८ मे रोजी शहरातील परांजपे हायस्कूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .दापोली मधील अंध श्री सदस्य विजय गौरत यांनी रक्तदान करुन समाजात आदर्श निर्माण केला आहे याप्रसंगी असंख्य श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत १४३ श्री सदस्यांनी स्वयंशिस्तिने रक्तदान केले.याबाबत समाजातील विविध स्तरांतून प्रतिष्ठानचे कौतुक करण्यात येत होते.याप्रसंगी गुहागरचे आमदार भास्कर जाधव, जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, चिपळूण पंचायत समिती उपसभापती प्रताप शिंदे.अपरान्त हॉस्पीटल चे प्रतिनिधी, राजू कांबळे, तानाजी शिंदे लाईफ केअर हॉस्पीटलचे संदेश यादव, मुसा पिरजादे आदी मान्यवर उपस्थित होते.शहरातील परांजपे मोतीवाले हायस्कुल येथे शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी दीपप्रज्वलन डॉ भोसले,डॉ पानकर,डॉ केळस्कर,डॉ पोतदार,डॉ शामल चव्हाण यांच्याहस्ते तर प्रतिमापूजन डॉ सोनवणे,डॉ हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते,धन्वंतरी पूजन डॉ कंदळकर,डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमेस पुष्पहार डॉ .केळस्कर मॅडम यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.यावेळी रेडक्रॉस रक्तपेढी व सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढिचे सदस्य उपस्थित होते.डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी सन १९४३ सालापासुन प्रामुख्याने अंधश्रद्धा निर्मुलन व व्यसनमुक्ती याकरीता अध्यात्मिकतेची जोड देवुन श्री समर्थ बैठक सुरू करून लाखो लोकांना निरूपण श्रवणाची गोडी लावुन असंख्य लोकांचे आजवर कल्याण करून प्रत्येक मनष्याला सदगती देण्याचे कार्य केलेले आहे .मात्र पुढे पुढे हे कार्य इतक्यावरच न थांबता अखिल मनुष्याचे हिताकरीता डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ची स्थापना करून सदर प्रतिष्ठानचे वतीने गोरगरीब लोकांना वस्त्रवाटप , गरीब व गरजु विदयार्थ्यांना शालेल्य वस्तु, वहया-पुस्तके, दप्तरे यांचे वाटप , स्मशानशेडची उभारणी व त्याची स्वच्छता , प्रवासी निवारा शेड उभारणी , सार्वजनिक पाणपोई उभारणी , पाणी अडवण्याकरीता बंधारा बांधणे , दरवर्षी संपुर्ण देशस्तरावर स्वच्छता अभियान , तसेच दरवर्षी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे इत्यादी अनेक उपक्रम आजवर डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे वतीने नेहमीच अत्यंत निष्कामतेने कोणतीही अपेक्षा न करता केले जात आहेत . या सर्व उपक्रमांची जाणीव ठेवुन किंबहुना स्वच्छता अभियानाचा उपक्रमाची दखल घेत भारत सरकारमार्फत आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छता दुत म्हणुन देखील नेमणुक झालेली आहे या प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध माध्यमातून रक्तदान शिबिरांचे शिस्तबद्ध आयोजन केले जाते.ज्याठिकाणी रक्ताची नितांत आवश्यकता आहे तिथे गरजवंतापर्यंत रक्त पोहचवणे आवश्यक समजून या शिबिराचे आयोजन करण्यात येते.यासाठी डॉ .श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चे वतीने डॉ . श्री . आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेल्या प्रेरणेतुन व डॉ . श्री . सचिनदादा धर्माधिकारी यांनी श्री सदस्यांना केलेल्या मार्गदर्शनानुसार श्री सदस्य नेहमीच तयार असतात.
लाखो श्री सदस्यांचे श्रद्धास्थान असणारे पदमश्री डॉ . आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा नुकताच दिनांक १४ मे २०२२ रोजी वाढदिवस झाला . मात्र व्यक्तीगत वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आपणही समाजाचे व देशाचे काही देणे लागतो हे देणे देण्याकरीता खारीचा वाटा म्हणुन आपण समाजाकरीता निष्कामतेने समाजसेवेचे कार्य केले पाहीजे अशी शिकवण श्री समर्थ बैठकीचे माध्यमातुन श्री सदस्यांना देवुन त्याच प्रेरणेने चिपळूण शहरामध्ये परांजपे मोतीवाले हायस्कुल येथे १८ मे २०२२ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . सदर रक्तदान शिबीराकरीता गुहागर ,चिपळूण ,खेड, दापोली तालुक्यातुन शेकडो श्री सदस्य उपस्थित होते.
चौकट : दापोली येथून आलेले अंध श्री सदस्य विजय गौरत यानी रक्तदानातून समर्थांच्या शिकवणीचा दिला प्रत्यय
जेष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भुषण ति . डॉ . श्री . नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दीनिमित्त व जेष्ठ निरूपणकार पदमश्री डॉ . श्री . आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वाढदिवसानिमित्त तीर्थरूप डॉ . श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता . अलिबाग जि . रायगड यांचेवतीने श्री सदस्यांचे रक्तदान शिबिरात दापोली येथील विजय महादेव गौरत या अंध श्री सदस्याने रक्तदान करून समर्थांच्या शिकवणीचा प्रत्ययच समोर आणून दिला असल्याचे दिसून आले.सोबतच समाजसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.यावेळी बोलताना या श्री सदस्याने डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्याचा योग आला हे स्वतःचे भाग्य असल्याचे बोलून दाखविताना सद्गुरू कृपेने आपला कार्यभाग उत्तमरित्या सुरू असल्याचे सांगितले.सोबतच सर्व सदस्यांनी आज्ञेनुसार कार्यभाग करूया अशी भावनिक हाकही घातली.
———————————————————–
*⚛️भाऊराया हॅण्डलम्स, सोलापूर⚛️*
_*🤩घेऊन आले* आहेत…! महाराष्ट्रातील *नामांकित कापड उत्पादक👚* संस्थांचा *प्रत्यक्ष सहभाग* असलेले *आगळे-वेगळे* प्रदर्शन…!🤩_
*🏢सावंतवाडी* येथील *नारायण मंदिर🛕* येथे *हातमाग आणि यंत्रमाग* कापडाचे👚 *भव्य प्रदर्शन व विक्री🛍️* सुरू सोबत *कोणत्याही खरेदीवर 20%* सूट…💰!
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔷सुप्रसिद्ध सोलापूरातील हातमाग व यंत्रमाग वरील कॉटन ईरकली साडी
🔸धारवाड साडी 🔸मदुराई सिल्क साडी
🔹सेमी पैठणी साडी 🔹खादी सिल्क
🔸खादी कॉटन साडी 🔸प्रिंटेड ड्रेस
🔹वर्क ड्रेस कॉटन परकर 🔹टॉप पीस
🔸सोलापूर चादर 🔸बेडशीट
🔹नॅपकिन 🔹संतरंजी
🔸पंचा 🔸टॉवेल
🔹वुलन 🔹चादर
🔸दिवाणसेट 🔸प्रिंटेड बेडशीट
🔹शबनम बॅग 🔹पिलो कव्हर
🔸लुंगी शर्ट 🔸कुर्ता
🔹बंडी 🔹गाऊन
🔸लेडीज टॉप 🔸हॅन्डबॅग
याशिवाय *हातमाग व यंत्रमाग* वरील *उत्पादन* झालेल्या *असंख्य व्हरायटीच्या* मालावर *२०%* सूट…!💵
*_🥳प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या…!🤝_*
*🎴आमच्या प्रदर्शनाचा पत्ता:-* श्री देव नारायण मंदीर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी, जि. सिंदुधुर्ग
*📲संपर्क:-* *9325329105 / 9860890774*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_