कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयशैक्षणिक

उन्हाळी कालावाधीत पूर्णवेळ शाळा भरविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची काँग्रेसची मागणी

🛑उन्हाळी कालावाधीत पूर्णवेळ शाळा भरविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची काँग्रेसची मागणी

🛑चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचे शिक्षणमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना निवेदन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी-ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,३०: रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात उष्णता वाढल्याने पूर्णवेळ शाळा भरविण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाचा पुनर्विचार करून उन्हाळी कालावधीत सकाळच्या सत्रात शालेय कामकाज करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी चिपळूण तालुका काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष प्रशांत यादव यांनी शिक्षणमंत्री मा. ना. वर्षाताई गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती (मान्यताप्राप्त) या संघटनेने याबाबत चिपळूण तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांना निवेदन दिले. या निवेदनाची त्वरित दखल घेऊन श्री. यादव यांनी यासंदर्भात तातडीने शिक्षणमंत्री मा. ना. वर्षाताई गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले साहेब यांना निवेदन पाठवून उन्हाळी कालावधीत शाळांच्या वेळेतील बदलबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात श्री. यादव यांनी म्हटले आहे, की रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात उष्णता वाढली आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमधील शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये पंख्यांची उपलब्धता नाही. तसेच जिल्ह्याला वीज भारनियमनालाही सामोरे जावे लागत आहे. त्यातच पाणीटंचाईचाही सामना अनेक शाळांना करावा लागत आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून शालेय पोषण आहारही बंद आहे. मात्र शिक्षण विभागाच्या आदेशानुसार दुपारच्या सत्रात पूर्णवेळ शाळा भरविण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील सध्याचे हवामान आणि शाळांमधील वर्गखोल्यांतील गैरसुविधा पाहता दुपारच्या सत्रात पूर्णवेळ शाळा भरविणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून सकाळी 10.30 ते 5 या वेळेत शैक्षणिक कामकाजाच्या आदेशात बदल करून उन्हाळी कालावधीत सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत शालेय कामकाज करण्याचे सुधारित निर्देश आपल्या स्तरावरून देण्यात यावेत, अशी विनंतीही श्री. यादव यांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती (मान्यताप्राप्त) या संघटनेने चिपळूण तालुका काँग्रेसकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी मांडलेल्या समस्या रास्त आहेत. तरी या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन शालेय कामकाजाच्या वेळेत बदल करण्याबाबत शिफारस करण्यात यावी, अशी विनंतीही श्री. यादव यांनी केली आहे.श्री. यादव यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती (मान्यताप्राप्त) या संघटनेने दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याबद्दल संघटनेने श्री. यादव यांचे आभार मानले.

———————————————
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!