आरजीपीपीएल’साठी भास्करराव जाधव यांचे खा. शरदचंद्र पवार यांना साकडे.
🟥आरजीपीपीएल’साठी भास्करराव जाधव यांचे खा. शरदचंद्र पवार यांना साकडे.
🟥दिल्लीत लवकरच पेट्रोलियम मंत्र्यांसमवेत बैठक घेण्याचे खा. पवार यांचे आश्वासन
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,१५ : गुहागर तालुक्यात असलेल्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्ट या कंपनीमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार टिकून राहावा यासाठी प्रयत्न करणारे आमदार श्री. भास्करराव जाधव हे अडचणीत आलेला हा प्रकल्पही चालू राहिला पाहिजे यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. याचसाठी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी श्री. पवार साहेब यांनी याप्रश्नी लवकरच दिल्लीमध्ये पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट हा १९६७ मेगावॅट क्षमता असलेला गॅसवर आधारित भारतातील सर्वात मोठा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. परंतु, गॅसची वाढलेली किंमत आणि पर्यायाने निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्त असल्याने वीज खरेदी करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे हा प्रकल्प सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे.
रत्नागिरी गॅस अँड पावर प्रोजेक्टचा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसोबत सन २०३२ पर्यंत वीज खरेदीचा करार असताना महावितरणने सन २०१४ पासून वीज खरेदी थांबवली आहे तर दुसरीकडे भारतीय रेल्वेला सुरू असलेला ५४० मेगावॅट वीज पुरवठाही थांबला आहे. परिणामी हा प्रकल्प सद्यस्थितीत खूपच अडचणीत आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कंपनीतील कर्मचार्यांच्या पाठीशी आमदार श्री. भास्करराव जाधव हे ठामपणे उभे आहेत. त्यांचा रोजगार टिकून राहावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु त्याचबरोबर प्रकल्पही सुरू राहिला पाहिजे यासाठी त्यांनी ठोस प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते मुंबईत अनेकांना भेटले. त्यात आज खासदार मा. श्री पवार साहेब यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंथा, कंपनीचे सल्लागार हिरानंद हरचंदानी, सहाय्यक व्यवस्थापक सबरी गिरीश एन हेदेखील उपस्थित होते. कंपनीकडे वेगवेगळ्या राज्यातून विजेची मागणी आहे परंतु वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला गॅस कमी किंमतीत उपलब्ध होत नाही. कंपनीचे अधिकारी त्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यात त्यांना यश येत नाही, ही बाब आमदार श्री जाधव यांनी श्री. पवार साहेब यांच्याकडे मांडली आणि यावर मार्ग काढण्याची विनंती केली. श्री. पवार यांनी हा संपूर्ण विषय अत्यंत गांभीर्याने समजून घेतला आणि आमदार श्री भास्करराव जाधव, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना लवकरच दिल्लीमध्ये बोलावून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. बैठकीत झालेल्या आश्वासक चर्चेमुळे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अत्यंत समाधानी झाले. ही बैठक घडवून आणण्यास पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आमदार श्री भास्करराव जाधव यांचे आभार मानले.
———————————————————–
*⚛️भाऊराया हॅण्डलम्स, सोलापूर⚛️*
_*🤩घेऊन आले* आहेत…! महाराष्ट्रातील *नामांकित कापड उत्पादक👚* संस्थांचा *प्रत्यक्ष सहभाग* असलेले *आगळे-वेगळे* प्रदर्शन…!🤩_
*🏢सावंतवाडी* येथील *नारायण मंदिर🛕* येथे *हातमाग आणि यंत्रमाग* कापडाचे👚 *भव्य प्रदर्शन व विक्री🛍️* सुरू सोबत *कोणत्याही खरेदीवर 20%* सूट…💰!
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔷सुप्रसिद्ध सोलापूरातील हातमाग व यंत्रमाग वरील कॉटन ईरकली साडी
🔸धारवाड साडी 🔸मदुराई सिल्क साडी
🔹सेमी पैठणी साडी 🔹खादी सिल्क
🔸खादी कॉटन साडी 🔸प्रिंटेड ड्रेस
🔹वर्क ड्रेस कॉटन परकर 🔹टॉप पीस
🔸सोलापूर चादर 🔸बेडशीट
🔹नॅपकिन 🔹संतरंजी
🔸पंचा 🔸टॉवेल
🔹वुलन 🔹चादर
🔸दिवाणसेट 🔸प्रिंटेड बेडशीट
🔹शबनम बॅग 🔹पिलो कव्हर
🔸लुंगी शर्ट 🔸कुर्ता
🔹बंडी 🔹गाऊन
🔸लेडीज टॉप 🔸हॅन्डबॅग
याशिवाय *हातमाग व यंत्रमाग* वरील *उत्पादन* झालेल्या *असंख्य व्हरायटीच्या* मालावर *२०%* सूट…!💵
*_🥳प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या…!🤝_*
*🎴आमच्या प्रदर्शनाचा पत्ता:-* श्री देव नारायण मंदीर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी, जि. सिंदुधुर्ग
*📲संपर्क:-* *9325329105 / 9860890774*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_