कोकणसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी शहरातील मोक्याच्या जागा परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा घाट?

*🟥सावंतवाडी शहरातील मोक्याच्या जागा परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा घाट*

*🟥श्रीराम वाचन मंदिराची मोकळी जागा कोणतीही निविदा प्रसिद्ध न करता परस्पर भाड्याने देणाऱ्या संस्था चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी , दि.२ नोव्हेंबर*
सावंतवाडी हे संस्थानचा पगडा असलेले व श्री देव पाटेकर व रयत पिलगिचा रक्षण कर्ता श्री देव उपरलकर यांच्या कृपा आर्शिवादाने पुणीत झालेले शहर व ज्या संस्थानाने खऱ्या अर्थाने शैक्षणिक वारसा जपला त्या शहरातील मोती तलावाच्या समोर असलेल्या श्रीराम वाचन मंदिरात अनेक लेखक विचारवंत यांनी ज्ञानाचे धडे घेतले व इतरांना दिले त्याच वाचनालयाचा कारभार हाकणारे आज वाचनालयाची मोकळी जागा काहीतरी गोड बंगाल करून अनधिकृत शेड उभारण्यासाठी देतात व त्या ठिकाणी दोन दिवसात आलिशान दुकान थाटले जाते यावरून यामागे निश्चितच काहीतरी आर्थिक व्यवहार झाला असावा असा संशय आम्हाला वाटतो, कारण मोक्याच्या जागी अशा प्रकारे तात्पुरत्या स्वरूपाची का असेना,पण रातोरात दोन दिवसात त्या ठिकाणी दुकान थाटले जाते यामध्ये निश्चितच गोड बंगाल आहे.
सार्वजनिक न्यास असलेल्या श्रीराम वाचनालयाच्या या जागेमध्ये अशाप्रकारे गैर व्यवहार चालत असेल तर संस्थेच्या एकूण कारभाराबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले तर नवल वाटू नये, याबाबतची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.
वाचनालयाच्या इमारतीसाठी सोडलेल्या मोकळ्या जागेचा वापर सावंतवाडी नगर परिषदेच्या कार्यालयापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असताना सुद्धा ही बेकायदा शेड उभारण्याचे धाडस कसे काय केले जाते? की यामध्ये नगर परिषदेच्या प्रशासनाचा पण हात आहे? मुख्याधिकारी याबाबत गप्प का? मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीस का बजावली नाही? नगर परिषदेच्या रस्त्याच्या बाजूलाच लागून आलिशान थाटलेल्या त्या दुकानाला कुणाचा वरदहस्त आहे? यावर राजकीय मंडळी गप्प का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, शहरातील अनेक व्यापाऱ्याने याबाबत कोकण लाईव्ह कडे विचारणा केल्याने याबाबत आवाज उठविणे आम्हाला क्रमप्राप्त ठरत आहे.
सावंतवाडी शहर हे सुसंस्कृत शहर ,शैक्षणिक वारसा लाभलेले शहर, या शहरावर विचारवंतांचे राज्य आहे असे मानले जाते, मात्र अलीकडच्या काळात या विचारवंतांच्या राज्याला कुठेतरी गाल बोट लागत असल्याच्या घटना घडत आहे ,ज्या वाचन मंदिरात ज्ञान दिले जाते त्याच वाचन मंदिराच्या संस्थाचालकानी वाचन मंदिराची मोकळी जागा परिप्रांतीच्या घशात घालावी, आणि सावंतवाडीच्या रहिवाशांनी ते उघड्या डोळ्यांनी पहावे यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
सावंतवाडी शहरावर स्थानिक व्यापाऱ्यांचे वर्चस्व राहिले नाही, परप्रांतीय व्यापाऱ्यांनी घुसखोरी करून आपली बाजारपेठ काबीज केली आहे, गवत मार्केट ,संत गाडगे बाबा मंडई ,यावर व नवीन बांधलेल्या कॉम्प्लेक्स वर परप्रांतीयांचा भरणा अधिक आहे, असे असताना सावंतवाडी शहरातील मोक्याची जागा पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या घशात घालण्याचे काम होत असल्याने याबाबत शहरवासीयाने उठाव करण्याची वेळ आली आहे.
सावंतवाडी शहरात फेरीवाले म्हणून आलेले परप्रांतीय आता सावंतवाडी शहरावर राज्य करण्याची स्वप्ने पाहत आहेत, शासनाच्या विविध कमिट्यांवर त्यांना स्थान दिले जात आहे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर ही मंडळी प्रतिनिधित्व करत असल्याने लोकांना हाताशी धरून ते वाटेल ते खेळ खेळू लागले आहेत,वास्तविक अशा प्रकारची जागा संस्थेला भाड्याने द्यायची असेल तर ती रीतसर निविदा काढून भाड्याने देणे कर्म प्राप्त ठरते, मात्र वाचनालयाच्या मोकळ्या जागेचा वापर कोणालाही माहिती न देता परस्पर भाडेतत्त्वावर देणे हा प्रकार गैर व्यवहारात मोडत असल्याने संबंधित प्रकरणाची चौकशी होऊन जिल्हाधिकारी यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी आमची रास्त मागणी आहे,व गुंगीत असलेल्या नगरपालिका प्रशासनाला चटके देऊन वटणीवर आणावे अशी मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत.
शहरात भाजी विक्री, मासे विक्री, करणाऱ्या गरीब महिलांना त्रास देणाऱ्या व त्यांचे सामान जप्त करणारे नगरपालिका प्रशासन शहरात अशा प्रकारचे बेकायदेशीर कामे होत असताना डोळे मिटून गप्प का?की यांना ही कोणी तरी लोणी खाऊ घातले आहे असा संशय बळावला आहे.की 50 खोके एकदम ओके सारखे हे प्रकरण नाही ना?अशी चर्चा आता बाजारपेठेत रंगू लागली आहे, शहराच्या मुख्य रस्त्यालगत पत्र्याची शेड उभारून दुकान थाटून शहराच्या सौंदर्यकरणात बाधा आणणारे प्रकार केले जात आहेत,तरीही सर्वजण तेरी मी चूप और मेरी भी चूप असेच वागत आहेत, त्यामुळे एकंदरीत या प्रकरणाबद्दल संशय अधिकच बळावला आहे, म्हणून या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात जातीनिशी लक्ष घालून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश द्यावे अशी मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
MS PATEL CONSTRUCTION
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!