सातारा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी आमदार शेखर निकम यांचा कंदी पेढ्याचा हार घालून केलेला विशेष सत्कार ठरला लक्षवेधी
🟥सातारा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी आमदार शेखर निकम यांचा कंदी पेढ्याचा हार घालून केलेला विशेष सत्कार ठरला लक्षवेधी
🟥वेहेळे भोजनेवाडी येथील कबड्डी स्पर्धेत कालभैरव कोयनानगर प्रथम क्रमांकाचा मानकरी
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण,१४मे:* ‘तालुक्यातील वेहेळे भोजनेवाडी येथील राधाकृष्ण मंदिराच्या भव्य महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. मॅटवरील कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांक क्रमांकांचा कालभैरव कोयनानगर मानकरी ठरला आहे. तर या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी आमदार शेखर निकम यांचा साताऱ्यातील सुप्रसिद्ध कंदी पेढ्यांचा हार घालून भव्यदिव्य सत्कार केला. या सत्काराने आ. श्री. निकम भारावून गेले. हा सत्कार उपस्थित मान्यवरांन करिता खास लक्षवेधी ठरला होता .या कार्यक्रमाचा भाविक व क्रीडा रसिकांनी पुरेपूर आनंद लुटला.
वेहेळे भोजनेवाडी येथे राधाकृष्ण मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यावेळी कीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम उत्साहीपूर्ण वातावरणात पार पडले. याचबरोबर मॅटवरील कबड्डी स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत कालभैरव कोयनानगर हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय महाकाली कुंभार्ली संघ, तृतीय सिद्धिविनायक कळकवणे तर चतुर्थ क्रमांक सिद्धार्थ धामणे संघाने मिळवला या यशस्वी संघांना आमदार शेखर निकम व सातारा नगरपरिषदेचे सुहास राजेशिर्के यांच्यासह वेहेळे भोजनेवाडी येथील ग्रामस्थांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
*राधाकृष्ण मंडळाचे कार्य कौतुकास्पद : आमदार शेखर निकम*
यावेळी आमदार शेखर निकम आपल्या मनोगतात म्हणाले की, सलग गेली २५ वर्षे राधाकृष्ण मंडळाने राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे प्रिय महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व कबड्डी स्पर्धेचे नियोजन करून येथील क्रीडा रसिकांना आपला खेळ दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली. खेळाडूने जिंकण्यासाठी खेळायचे असते. मॅच संपल्यानंतर सर्व विसरून जायचं आहे. खेळ असो अथवा कोणतेही क्षेत्र असो. त्या त्या चुका करायच्या नाहीत. चुका सुधारता आल्या पाहिजेत. खेळाबरोबर फिटनेस देखील महत्त्वाचे आहे असे सांगताना सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी कोरोना काळात आपल्या जन्मभूमीत केलेले काम कौतुकास्पद आहे, अशा शब्दात श्री. राजेशिर्के यांचे कौतुक केले.
*जीवनात जिद्द महत्वाची- सुहास राजेशिर्के*
तर सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहासस राजेशिर्के यांनी आपल्या मनोगतात राधा-कृष्ण युवक मंडळाची तळमळ धडपड पाहून भारावून गेलो आहे. कबड्डी खेळाचा यानिमित्ताने आनंद लुटता आला. आपण खेळात जसे समरस होतो तसे प्रत्येक क्षेत्रात समरस झाले पाहिजे. जिद्दीच्या जोरावर आपण इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सांगत प्रत्येकाने जिद्द कायम ठेवा राजकारणात सातारा येथे नाव कमावले नंतर जन्मभूमी कडे आलो आहे. राजकारण वाईट नाही. माईंड गेम आहे. राजकारणात अचूकपणा, वेळेचे भान व सर्वांना सोबत घेऊन जातो. तू राजकारणात यशस्वी होतो अशा शब्दात राजकारण वाईट नाही याचा न अक्षर करताना सर्वांनी जिद्द ठेवा असे आवाहन यावेळी केले. यावेळी माजी उपसभापती सुर्यकांत खेतले, माजी पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, वेहेळे ग्रामपंचायत माजी उपसरपंच प्रकाश भोजने, सदस्य दिलीप भोजने, माजी सरपंच दिलीप राजेशिर्के, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष उदय भोजने, गोविंद मिरगल, महेश वाजे, राम राजेशिर्के, बंड्या राजेशिर्के तसेच राधाकृष्ण युवक मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व मॅटवरील कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
———————————————————–
*⚛️भाऊराया हॅण्डलम्स, सोलापूर⚛️*
_*🤩घेऊन आले* आहेत…! महाराष्ट्रातील *नामांकित कापड उत्पादक👚* संस्थांचा *प्रत्यक्ष सहभाग* असलेले *आगळे-वेगळे* प्रदर्शन…!🤩_
*🏢सावंतवाडी* येथील *नारायण मंदिर🛕* येथे *हातमाग आणि यंत्रमाग* कापडाचे👚 *भव्य प्रदर्शन व विक्री🛍️* सुरू सोबत *कोणत्याही खरेदीवर 20%* सूट…💰!
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔷सुप्रसिद्ध सोलापूरातील हातमाग व यंत्रमाग वरील कॉटन ईरकली साडी
🔸धारवाड साडी 🔸मदुराई सिल्क साडी
🔹सेमी पैठणी साडी 🔹खादी सिल्क
🔸खादी कॉटन साडी 🔸प्रिंटेड ड्रेस
🔹वर्क ड्रेस कॉटन परकर 🔹टॉप पीस
🔸सोलापूर चादर 🔸बेडशीट
🔹नॅपकिन 🔹संतरंजी
🔸पंचा 🔸टॉवेल
🔹वुलन 🔹चादर
🔸दिवाणसेट 🔸प्रिंटेड बेडशीट
🔹शबनम बॅग 🔹पिलो कव्हर
🔸लुंगी शर्ट 🔸कुर्ता
🔹बंडी 🔹गाऊन
🔸लेडीज टॉप 🔸हॅन्डबॅग
याशिवाय *हातमाग व यंत्रमाग* वरील *उत्पादन* झालेल्या *असंख्य व्हरायटीच्या* मालावर *२०%* सूट…!💵
*_🥳प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या…!🤝_*
*🎴आमच्या प्रदर्शनाचा पत्ता:-* श्री देव नारायण मंदीर, मोती तलाव जवळ, सावंतवाडी, जि. सिंदुधुर्ग
*📲संपर्क:-* *9325329105 / 9860890774*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_