शेर्लेत केबल खोदाईच्या कामामुळे पाईपलाईनचे नुकसान ग्रामस्थांनी केबल खोदाईचे काम रोखले..
🟥शेर्लेत केबल खोदाईच्या कामामुळे पाईपलाईनचे नुकसान ग्रामस्थांनी केबल खोदाईचे काम रोखले..
🟥निगुडेत चार दिवस पाण्याचा तुटवडा; ग्रामस्थांनी घेतला आक्रमक पवित्रा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी,दि.३: शेर्ले-निगुडे-सोनुर्ली मार्गावर शेर्ले बिजली तिठा येथे असलेली पाण्याची पाईपलाईन केबल खोदाईच्या कामामुळे तुटली. ग्रामस्थांना उद्भवणारी पाण्याची समस्या लक्षात घेत ग्रामस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी पहिल्यांदा काम रोखले त्यानंतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तात्काळ पाण्याची लाईन दुरुस्ती करा असे सांगत आक्रमक पवित्रा घेतला. दुपारी उशिरापर्यंत काम बंद होते.
बांदा भाजप मंडळ अध्यक्ष महेश धुरी, निगुडे सरपंच समीर गावडे, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
निगुडे येथील ग्रामस्थांना पाण्याचा तुटवडा होत असल्याने सरपंच समीर गावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तीन दिवस गावात पाणी येत नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात पुन्हा जर पाण्याची पाईपलाईन तुटल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंपनीची राहील असे ते म्हणाले.
दरम्यान, बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी यांनी आक्रमक पवित्रा घेत पावसाळा तोंडावर येत असून बांधकाम विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. चैन मशीन रस्त्यावर उतरवून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एकीकडे रस्ता दुरूस्ती करण्यासाठी निधी नाही तर दुसरीकडे रस्त्यांची वाट लावण्यासाठी अशी शक्कल लढवली जाते का असा सवाल महेश धुरी यांनी बांधकाम विभागास केला. ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहून सुरेश गावडे यांनी बांधकाम विभागाचे अभियंता अनिल आवटी यांच्याशी संपर्क साधून उद्या मंगळवारी संपूर्ण मार्गाची पाहणी करण्यास सांगितले. उशिरापर्यंत केबल खोदाईचे काम बंद होते.
_________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_
*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*
*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067
*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/
*अटी आणि शर्ती लागू*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

