तुम्ही कधीही मला हाक द्या मी तुमच्या सेवेसाठी सदैव तयार.. नगराध्यक्ष संजू परब
🛑नगराध्यक्ष परब व सौ.संजना परब यांचा सांगेली ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला सत्कार
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,दि,५: मला तुमच्या गावात बोलून माझा जो तुम्ही सत्कार करून मला जी शाल पांघरली ती शाल खरंच मला आपुलकीची वाटते हेच नातेसंबंध आणि प्रेम तुम्ही माझ्यावर कायम ठेवा शिक्षण आणि आरोग्य आणि शासकीय पातळीवर जर समाजातील कोणाची काही अडचणी असतील तर निश्चित तुम्ही मला हाक द्या त्या मी सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असे मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे नूतन अध्यक्ष तथा सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगेली येथे गावाच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते सागेली येथे गावकऱ्यांच्या वतीने श्री परब यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी संपूर्ण गावाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने श्री परब यांचा व त्यांच्या सौभाग्यवती संजना परब या दोघांचाही शाल व श्रीफळ देऊन गावचे गावकर तथा मंडळाचे उपाध्यक्ष पंढरी पुनाजी राऊळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष दत्ताराम सडेकर सचिव एडवोकेट संतोष सावंत खजिनदार भुपेंद्र सावंत सहसचिव विनोद सावंत दत्ता सावंत साई हवालदार सत्यजित धारणकर मकरंद तोरस्कर सुहासिनी स डे कर मेघना राऊळ उज्वला सावंत विश्वनाथ राऊळ बाबुराव कविटकर भक्ती सावन विष्णू राऊळ महादेव राऊळ नारायण मिस्त्री पुंडलीक कदम बाबाजी मिस्त्री सुरेश राऊळ बाळकृष्ण राऊळ नारायण राऊळळ लक्ष्मण राऊळ पुरुषोत्तम राऊळ आनंद राऊळ आदी उपस्थित होते यावेळी श्री परब म्हणाले मी आतापर्यंत अनेक सत्कार स्वीकारले पण हा सत्काराने मी भारावून गेलो आहे मी कधी जात पात धर्म पाळत नाही सर्व जण आपण एका समाज घटकातील आहोत त्या भावनेनेच काम करतो आणि आताही करत आलो आहे त्यामुळे सर्व समाज घटकातील बांधवांचा शिक्षण आरोग्य बाबतीत ते कसे सक्षम होतील या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी मी कार्यरत आहे माझ्या वडील आणि हे मंडळ स्थापन केले आणि या मंडळाची व्याप्ती वाढावी आणि त्याचबरोबर बहुजन समाज बांधवांचा विकासात्मक पाया घट्ट व्हावा यासाठी आपण ही जबाबदारी स्वीकारली आहे माझं पुढील महत्वकांक्षा तालुक्याचा विकास करणे हे माझे आहे तुम्ही कधीही मला हाक द्या मी तुमच्या सेवेसाठी तयार आहे मंडळाच्या वतीने निश्चितच तुम्हा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील असे ते म्हणाले यावेळी दत्ताराम सडेकर, सुहासनी सडेकर मेघना राऊळ पंढरी राऊळ यांनी आपले विचार मांडले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट संतोष सावंत यांनी केले तर उपस्थितांचे आभार विश्वनाथ राऊळ यांनी मानले.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

