Uncategorizedकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

एकमेकांना मदतीचा हात देऊया “कोळेकर” कुटुंबीयांचे घर पुन्हा एकदा उभे करूया…मा. नगराध्यक्ष.साळगावकर

🟥 एकमेकांना मदतीचा हात देऊया “कोळेकर” कुटुंबीयांचे घर पुन्हा एकदा उभे करूया…मा. नगराध्यक्ष.साळगावकर

🟥सामाजिक बांधिलकी या संस्थेच्या माध्यमातून दानशुरांना मदतीची हाक ..

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,२६: शहरातील बॅड बाॅइज संघातील हुकमी खेळाडू कै.तानाजी कोळेकर कुंटूबियांचे घर पुन्हा एकदा दिमाखात उभे करण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या टिमने सामाजिक बांधिलकी या संस्थेच्या माध्यमातून दानशुरांना मदतीची हाक देत केशवसुत कट्ट्यावरील तुतारी प्रमाणे पुन्हा एकदा घरे उभे करण्याची जबाबदारी बबन साळगावकर यांनी घेतली आहे.
पावसाळ्यापूर्वी त्यांचे घर उभे रहावे, असा सर्वांचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक असल्यास प्रसंगी झोळी घेवून दानशूर व्यक्तींकडे फिरावे लागले तरी चालेल असे साळगावकर म्हणाले, .
श्री. साळगावकर पुढे म्हणाले, शहरातील एका कोळेकर कुटुंबात तीन वृद्ध बहिणी एकमेकांच्या साह्याने आपला चरितार्थ सांभाळत आहे. त्यातील एका बहिणीच्या पायाला दुखापत होऊन चालता येत नसल्यामुळे “त्या” जमिनीला खिळल्या आहेत. त्यांना सांभाळण्यासाठी दुसरी बहीण घरीच असते. तर तिसरी बहीण मासे भाजी विक्री करून दैनंदिन खर्च सांभाळत आहे. अशा हलाखीच्या परिस्थितीत जगत असताना त्यांच्या डोक्यावरील छप्पर सुद्धा जीर्ण झाले आहे. या कुटुंबियांना गतवर्षी सुद्धा कोरोना काळात अनेकांनी अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली. मात्र ते कुटुंब वास्तव्यास असलेल्या घराचे छप्परच मोडकळीस आल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरून आतील सामानाची नासाडी झाली होती. त्यामुळे हतबल बनलेल्या या कुटुंबाचे घर पुन्हा उभे राहण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तब्बल दीड ते दोन लाखाचा खर्च येणार आहे. त्यादृष्टीने दानशूर व्यक्तींनी व येथील सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी पुढे यावे, घर उभारणीसाठी लागणारे चिरे, वाळू, सिमेंट, पत्रे आदी साहित्य व पैशांच्या स्वरूपात मदत करावी, असे आव्हान त्यांनी केले. तर शहरातील केशवसुत कट्ट्यावरील तुतारीच्या नूतनीकरणासाठी आम्ही केलेल्या आवाहनाला लोकसहभागातून यश आले होते.
कोळेकर कुटुंबियांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून करत आहे. त्यामुळे यासाठी सर्वांनी पुढे येऊन आपला मदतीचा हात द्यावा, आणि पावसाळ्यापूर्वी त्यांचे घर उभे राहावे, यासाठी सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नांना यश द्यावे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान आपली मदत कोळेकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक खाते क्रमांक ०२२४००००००२०८८६, IFSC CODE : SIDC ०००१०२२ यावर जमा करावी, व अधिक माहितीसाठी रवी जाधव ९४०५२६४०२७, संजय पेडणेकर – ७०२०८१२७१९ या नंबरवर संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!