कोकणक्राइममहाराष्ट्रवेंगुर्लेशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

निवती पोलीस आणि एल. सी. बी. सिंधुदुर्ग यांची कुडाळ तालुक्यात रात्री पटावरील मोठी कारवाई

🟥निवती पोलीस आणि एल. सी. बी. सिंधुदुर्ग यांची कुडाळ तालुक्यात रात्री पटावरील मोठी कारवाई

🟥अनैतिक धंदेवाल्यांचे धाबे दणाणले..

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ले,२६: निवती पोलीस आणि एल. सी. बी. सिंधुदुर्ग यांची कुडाळ तालुक्यात पटावरील मोठी कारवाई रात्री झाल्याने अनैतिक धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यातील आंदुर्ले पिंपळाची रेवटी येथे रात्रौ टाकलेल्या संयुक्त छाप्यामध्ये बिगरकायदा अंदर बाहर पत्याच्या जुगारावर पैसे लावून खेळ खेळत असताना सहा जणां सोबत साहित्य व रोख रक्कम, वाहने, मोबाईल यांचेसह सुमारे 4 लाख 96 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी निवती पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंध कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. निवती पोलीस ठाण्यात पोलीस जयेश वासुदेव सरमलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, पोलिसांनी छापा टाकला तेव्हा वेंगुर्ले येथील प्रल्हाद पेंडणेकर वय 37, संजय केरकर वय 42, विश्वनाथ उर्फ मनोज वालावलकर, स्टेनि फर्नांडिस वय 31, सागर वैद्य य 18 व धुरीवाडा मालवण येथील विशाल मोहिते हे पटावर जुगार खेळताना आढळून आले. यावेळी एक निळ्या पांढऱ्या रंगाची चटई, एक चादर, चादरीवर वाढलेली 14 पत्त्याची पाने व सदर पानांवर मिळून आलेले रोख रक्कम तसेच पाच किमती मोबाईल, फोर्ड कंम्पनी ची JA 07 E 7647 असा नंबर असलेली फिगो कार, रजिस्ट्रेशन नसलेली नवीन TVS कंम्पनी ची ज्युपिटर टू व्हीलर, होंडा कंम्पनी काळसर रंगाची GA 03 AB 2745 या नंबर ची ऍक्टिवा, सुझुकी कंम्पनी ची काळसर रंगाची MH07 AP8739 क्रमांकाची स्कुटर आदी मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. या कारवाईत निवती पोलीस ठाण्याचे स.पो.नि. जी. व्ही. वारंग यांच्या सह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

_________________________
_🥭📦तुमच्या बागेतील आंबा थेट तुमच्या नातेवाईकापर्यंत.. ग्राहकांपर्यंत पोहोचवेल🥭 📦 *तेज कुरिअर्स..!!*_

*▪️महाराष्ट्र, गोवा, गुजरात सह संपूर्ण भारतभर सेवा*
*▪️ऑनलाईन ट्रेकिंग सुविधा*
*▪️खात्रीशीर आणि वेळेवर डिलिव्हरी*

*🔸बुकिंग साठी संपर्क व पत्ता*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067

*👇🏻तेज कुरिअर्स Facebook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/

*अटी आणि शर्ती लागू*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!