Uncategorized

कोकण लाईव्ह च्या दणक्यानंतर दारूबंदी अधीक्षकांची झोप उडाली..

▪️गोव्यातून दारू वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग करताना अपघात होऊन चालकाचा हात जायबंदी..

▪️गाडी सोडण्याचा हप्ता घेऊनही गाडीचा पाठलाग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची दारू वाहतूक करणाऱ्याची मागणी..

▪️दुसऱ्या धाडीत पकडली एक लाखाची गोवा बनावटी दारु..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.२८: कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलच्या दणक्याने जागे झालेले राज्य उत्पादन शुल्क आता गोवा राज्यातून दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवू लागले आहे. मात्र, कनिष्ठ अधिकार्‍यांनी केलेली मांडवळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नसल्यामुळे एका दारू वाहतूक  करणाऱ्याचा पाठलाग करताना सदरची गाडी पलटी होऊन अपघात झाला आहे. या अपघातात ड्रायव्हरचा हात फॅक्चर झाला असून त्याच्यावर कुडाळ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर लाखो रुपयाची दारू उत्पादन शुल्काच्या अधीक्षकांनी ताब्यात घेतली आहे. मात्र, अद्याप पर्यंत पुढील माहिती मिळू शकली नाही.

आमच्याकडून हप्ता घेऊनही आमच्या गाडीचा जीवघेणा पाठलाग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी सदरचा दारू विक्रेता आपल्या समाजातील लोकांना घेऊन राज्य उत्पादन शुल्क कुडाळ कार्यालयावर धडक देणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ज्या अधिकाऱ्याने सदरची दारू सोडण्यासाठी पैसे घेतले त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सदर दारू वाहतूक करणारा करणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची सुतभर कल्पना नसताना कनिष्ठ अधिकारी अशा प्रकारचे धाडस दाखवत असतील तर अधीक्षकांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

२७ ऑक्टोबर रोजी व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी जगताप यांनी अजित माळकर यांच्यावर कारवाई करत दोन दुचाकीसह एक लाख तीन हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पंधरा वीस हजार रुपयाची दारू पकडण्याची नाटके करण्यापेक्षा कोट्यावधी रुपयांची जिल्ह्यात व परराज्यात होणारी बेकायदा दारु वाहतूक रोखून त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दारू राज्य दारूबंदी उत्पादनशील शुल्क अधीक्षकांनी दाखवावे अशी मागणी केली जात आहे.

*_🔥फ्री होम डिलिव्हरी ती ही फक्त सावंतवाडी शहरापुरती मर्यादित..🔥_*

*🍝 शिवन्या फास्टफूड 🍜*
कोविड-19 च्या काळात आमच्या सर्व ग्राहकांसाठी सावंतवाडीत आम्ही पुन्हा एकदा सुरू करीत आहोत. *फ्री होम डिलिव्हरी* सुविधा आणि ती ही पूर्णपणे सुरक्षित..

🍢गोबी मंचुरी        ₹25/-
🥘फ्लॉवर चिल्ली   ₹40/-
🥟स्टीम मोमो        ₹20/-

*_🤷🏻‍♂️खायला येणार कुठे? त्यासाठी आमचा पत्ता आहे,_*
हॉटेल मँगो 1 समोर, सावंतवाडी..

*_🙋🏼‍♂️मग वाट कसली पाहताय! उचला फोन आणि करा कॉल.._*
*_📱9404931809_*
*_📱9146144203_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!