सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या सुशोभीकरणासाठी सावंतवाडी राष्ट्रवादीकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निधीची मागणी
🛑 सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या सुशोभीकरणासाठी सावंतवाडी राष्ट्रवादीकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निधीची मागणी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,३०: शहरातील साडेतीनशे वर्षांपूर्वीच ऐतिहासिक श्री देव आत्मेश्वर मंदीर, दामोदर भारती महाराज मठ आणि आत्मेश्वर तळीच्या नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी निधी मिळावा अशी मागणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्यात आली.
कुडाळ येथील बैठकीदरम्यान खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत आदींच्या उपस्थितीत ही मागणी करण्यात आली.
या वास्तूंना ऐतिहासिक वारसा लाभलेला असून सावंतवाडीच्या लौकिकात भर घालणाऱ्या या वास्तू आहे. या वास्तू पश्चिम महाराष्ट्रात देवस्थान कमिटीशी संलग्न आहेत. मात्र, या वास्तुच्या नुतनीकरण, सुशोभीकरणासाठी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी प्राप्त झाला नाही.
या वास्तूंसाठी ७५ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून हा निधी द्यावा अशी मागणी मंत्री आदीत्य ठाकरे यांच्याकडे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर यांनी केली. हे मंदिर सावंतवाडी संस्थानचे राजे तिसरे खेम सावंत-भोसले अर्थात ‘राजर्षी’ यांच्या काळात स्थापन करण्यात आले असून दोन शिवलिंग असणारे हे एकमेव मंदिर आहे. तर येथील आत्मेश्वर तळी ही बाराही महिने उतू (पाणी वाहते) जाते. या ठिकाणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थानची श्री देव आत्मेश्वर मंदीर व श्री दामोदर भारती महाराज उपसमिती असून याबाबत केलेल्या मागणीनंतर मंत्री आदीत्य ठाकरे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला.
यावेळी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल भोगटे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, नझीर शेख,सावंतवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, संतोष जोईल, इफ्तेकार राजगुरू, आसिफ शेख आदी उपस्थित होते.
________________________
*शिल्पग्राम* आता नवीन रूपात….
*_🏘️🏊♂️शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट 🍝🏊♂️_*
*🏊♂️सावंतवाडीत आता रिसॉर्टमध्ये पोहण्याचा आनंद घ्या, आणि आपली मेंबर शिप आजच बुक करा आणि रिसॉर्टच्या कोणत्याही सेवेवर घ्या १०% सूट🥰💵*
*🍽️🥣 मल्टीकूजन रेस्टॉरंट-* घ्या रुचकर इंडियन, चायनीज, तंदुरी, मालवणी व गोवन, जेवणाचा आस्वाद तो हि आमच्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये……
*🏘️ लक्झरियस रूम्स-* निसर्गरम्य अश्या परिसरात कॉटेजीस मध्ये राहण्याची सर्व सोईंनी सुसज्ज अशी व्यवस्था…….
*🤽♀️🏊♂️ स्विमिंग पूल-* भव्य असे पोहण्यासाठी स्विमिंग पूल ची व्यवस्था जिथे बसून आपल्याला मोकळ्या वातावरणात पुलसाईड डिनरचा आस्वादही घेता येईल. तसेच रात्रीच्या नयनरम्य अश्या वातावरणात पूलसाईड किटी पार्टी, बर्थडे पार्टीसाठी ची चांगली व्यवस्था उपलब्ध….
*▪️ मिटिंग रूम ची व्यवस्था -* २५ ते १०० लोकांची एकत्र बसून बिजनेस मिटिंग,
*_💫गेटटुगेदर किंवा पार्टी करण्यासाठी स्वतंत्र ए. सी व नॉन ए.सी हॉल ची व्यवस्था. आपल्या कार्यक्रमाला द्या आकर्षक भव्यता , वाढदिवस यासारखे भव्य व आकर्षक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र मोकळ्या जागेची व्यवस्था….._*
*📲अधिक माहिती साठी संपर्क -* *९१५८७५८७५९ । ७०८०८३२०२०*
*📍पत्ता -* शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट, खासकीलवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग -४१६५१०
*🌐वेबसाईट-* *www.shilpgramheritageresort.com*
*📧Email-* gmshilpgram@gmail.com
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

