महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने देशभरातील विविध केंद्रीय कामगार संघटनांचा संप
🛑केंद्र शासनाच्या आर्थिक व कामगार विषयक धोरणांना तीव्र विरोध
*🎴 सावंतवाडी:२६मार्च*
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने देशभरातील विविध केंद्रीय कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. हा संप सोमवार दिनांक 28 मार्च 2022 व 29 मार्च 2022 रोजी होणार आहे.
केंद्र शासनाच्या आर्थिक व कामगार विषयक धोरणांच्या विरोधात हा संप होणार आहे. विविध सरकारी उद्योगांचे खाजगीकरण हा या विरोधाचा प्रमुख मुद्दा आहे. यापैकी सरकारी बॅक खाजगीकरण या विषयावर जनसुनावणी घेण्यात येत आहे. या जनसुनावणीला सर्व समाज घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे. या प्रस्तावित बॅक खाजगीकरणा विरोधातील जन सुनावणीला महाराष्ट्र स्टेट को. आॅ.बॅक असोसिएशनचे संचालक विकास भाई सावंत हे अध्यक्ष स्थानी उपस्थित राहणार आहेत. निवृत्त प्राध्यापक विजय फातर्पेकर (पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी), अर्थतज्ज्ञ सुधीर नाईक (चार्टर्ड अकाऊंटट), संस्थापक अध्यक्ष काॅ. कृष्णाजी कोठावळे (विदर्भ कोकण ग्रामीण बॅक अधिकारी संघटना) आदी उपस्थित राहणार असून बॅक खाजगीकरणा विरोधाकरीता काॅ. लक्ष्मण चौकेकर(सहसचिव बॅक आॅफ इंडिया स्टाफ युनियन), काॅ. प्रसाद धुरी (विदर्भ कोकण ग्रामीण बॅक कर्मचारी संघटना) , काॅ. राजकुमार केळूसकर (बॅक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कोल्हापूर), काॅ. विशाल देसाई (कॅनरा बॅक एम्प्लॉईज युनियन) हे प्रमुख निमंत्रक आहेत.
बॅक खाजगीकरणा विरोधा करीता जनसुनावणी श्री राम वाचन मंदिर सभागृह, सावंतवाडी येथे दिनांक 28 मार्च 2022 रोजी सायंकाळी 4.00 वा. होणार आहे. या सुनावणीस तालुक्यातील समाज घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.