कोकणसिंधुदुर्ग

निरवडे हरिजनवाडी येथील स्मशान भूमीचा प्रश्न मार्गी

 

स्मशानभूमीला संरक्षक भिंत (कठडा) बांधण्याच्या कामाचे औपचारिक भूमिपुजन संपन्न

 

 

सावंतवाडी (सुखदेव राऊळ)

कित्येक वर्षांपासून रेंगाळलेला निरवडे हरिजनवाडी येथील स्मशान भूमीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. या स्मशानभूमीला संरक्षक भिंत (कठडा) बांधण्याच्या कामाचे औपचारिक भूमिपुजन करण्यात आले आहे.

सावंतवाडी तालुका पंचायत समितीचे सदस्य तथा माजी सभापती पंकज पेडणेकर यांच्या हस्ते पार पडलेल्या या भूमिपुजन सोहळ्यावेळी निरवडे सरपंच हरी वारंग,,उपसरपंच चंद्रकांत गावडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदा गावडे,ग्रामपंचायत सदस्य संदीप पांढरे, विस्तार अधिकारी मधुकर घाडी, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर,स्मशान भूमी साठी जागा देणारे जमीन मालक प्रणव नाडकर्णी, भगवान गावडे, मधुसूदन गावडे, बाबुराव गावडे, धर्माजी गावडे, गजानन जाधव, विजय जाधव, सत्यवान जाधव, गणपत जाधव, बाबुराव जाधव आदी उपस्थित होते.

या स्मशान भूमी चे हे काम महाराष्ट्र ग्रामीण योजना व 15 वा वित्त आयोग या निधी मधून करण्यात येत आहे. मागील कित्येक वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!