गॅस पाईपलाईनचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू
गॅस पाईपलाईनचे काम चुकीच्या पद्धतीने सुर
मुंबई गोवा महामार्गावर मळगांव- वेत्ये येथे एका दुचाकी चालकाचा अपघात
सावंतवाडी (सुखदेव राऊळ)
गॅस पाईपलाईनचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने मुंबई गोवा महामार्गावर मळगांव- वेत्ये येथे एका दुचाकी चालकाचा अपघात झाला. या अपघातात तो युवक गंभीर जख्मी झाला असून, त्या युवकाला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमी युवकावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.दरम्यान त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मळगांव वेत्ये येथे महामार्गावर गॅस पाईप लाईनचे काम सुरू असून, यावेळी रस्त्यावर रस्ता बंद करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने रॉड लावण्यात आले होते. या रॉडला अडकून एका दुचाकी चालकाचा अपघात झाला असून, तो गंभीर जखमी झाला आहे. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी सुरू असलेले काम बंद पाडले आहे. तसेच हे काम सुरू असताना योग्य ती काळजी घेण्यात यावी अशी मागणी वेत्ये गावचे उपसरपंच गुणाजी गावडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

