निरवडे झरबाजार निमंत्रीत भजन स्पर्धा
कै.विलास तानावडे व कै.दयानंद काळसेकर यांच्या स्मरणार्थ व गुरुव्दादशीनिमित्त भजन स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी (सुखदेव राऊळ)
श्री साटम महाराज कला क्रीडा सेवा मंडळ, निरवडे झरबाजारच्या वतीने कै. विलास तानावडे व कै. दयानंद काळसेकर यांच्या स्मरणार्थ व गुरुव्दादशीनिमित्त भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजता उद्घाटन होणार असून ही स्पर्धा 6.00 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
या भजन स्पर्धेत विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक 5 हजार 1 रुपये व सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र तर व्दितीय विजेत्यास 3 हजार 3 हजार 1 रुपये ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तर तृतीय विजेत्यास 2 हजार 1 रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. उकृष्ट हार्मोनियमवादक, उकृष्ट गायक व उकृष्ट पखवाजवादक, उकृष्ट तबलावादक , उकृष्ट झांजवादक, उकृष्ट कोरस यांना प्रत्येकी 1 हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेत पुढीलप्रमाणे सहभागी संघ आहेत.सायंकाळी 6.00 वाजता प्राथमिक शिक्षक कला मंच भजन मंडळ(कुडाळ),सायंकाळी 7.00 वाजता महापुरुष भजन मंडळ( पिंगुळी),रात्री 8.00 वाजता दत्तकृपा भजन मंडळ( वैभववाडी),रात्री 9.00 वाजता रवळनाथ भजन मंडळ(पिंगुळी) ,रात्री 10.00 वाजता स्वारधारा भजन मंडळ(तांबोळी),रात्री 11.00 वाजता नादब्रम्ह भजन मंडळ(कसाल),रात्री 12.00 वाजता दत्तगुरु भजन मंडळ( वैभववाडी),रात्री .00 वाजता सद्गगुरुनाथ भजन मंडळ(तुळस),रात्री 2.00 वाजता सद्गगुरु भजन मंडळ(तुळस वडखोल) हे 9 भजन संघ सहभागी होणार आहेत.

