कै.प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात जागतिक महिला दिनाचे आयोजन
मळगांवच्या सुकन्या श्रीमती नुतन बाळकृष्ण गोवेकर- बांदेकर यांचा कै.यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्काराने होणार सत्कार
सावंतवाडी (सुखदेव राऊळ):- मळगांव येथील कै.प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अथिती म्हणून मराठीतील प्रख्यात लेखिका श्रीमती माधुरी शानभाग उपस्थित राहणार आहेत.मंगळवार दिनांक 8 मार्च 2022 रोजी “वाचनाने मला काय दिले” या विषयासंदर्भात साहित्यप्रेमी आणि महिलांशी संवाद साधणार आहेत.त्याचप्रमाणे देश विदेशातून भ्रंमतीतून साठविलेल्या आठवणी आणि आपल्या लेखनातून मांडलेल्या विचारांव्दारे प्रा. शानभाग श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास श्रीमती उज्ज्वला यशवंतराव खानविलकर- पटेकर पुरस्कृत कै.यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्काराने गावातील एका कर्तृत्वान महिलेचा सन्मान करण्यात येणार आहे.यावर्षी ठाणे महानगरपालिका येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त लेखिका व्याख्यात्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मळगांवच्या सुकन्या श्रीमती नुतन बाळकृष्ण गोवेकर- बांदेकर यांचा प्रमुख अथिती यांच्या हस्ते वाचनमंदिराच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्यास मळगांव परिसरातील साहित्यप्रेमी,वाचक व महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनमंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
.

