कोकणसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याला नशीला पदार्थांचा घट्ट विळखा, मुलांना आवरण्याची पालकांसमोरची मोठी डोके दुखी

*🛑 सिंधुदुर्ग जिल्ह्याला नशीला पदार्थांचा घट्ट विळखा, मुलांना आवरण्याची पालकांसमोरची मोठी दुखी*

*🛑 नशील्या पदार्थांच्या बरोबर गोवा बनावटीच्या विषारी दारु मुळे अनेकांचे मृत्यू*

*🛑शहरातील निर्जन स्थळे बनली अमली पदार्थांचे केंद्रबिंदू*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴 सावंतवाडी :२४ फेब्रवारी*
तरूणांना अमली पदार्थाचा विळखा… अमली पदार्थाची विक्री करताना टोळीला अटक… रेल्वे फूटपाथवर चालतो अमली पदार्थाचा धंदा… अमली पदार्थाच्या सेवनाने दोघांचा मृत्यू… विमानतळावर तीन कोटींचे ड्रग्ज सापडले… दोघांना अटक… अशा आशयाच्या बातम्या आपण रोज वर्तमानपत्रात व न्यूज चॅनेलवर वाचतो.. ऐकतो. आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. आपल्या देशाच्या हद्दी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या देशाला लागून असल्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे. पालकांना तरूणांना यापासून रोखण्याची समस्या सतावत आहे. शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे. दरवर्षी २६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. .
भावी तरूण पिढीला वाचविण्यासाठी शासनच सरसावले आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद ४७ मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी (औषधीय प्रयोजनाव्यतिरिक्त) मादक पदार्थावरील बंदीची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्याचे व्यसनमुक्ती धोरण निश्चित करण्यात आले असून या विभागाच्या दिनांक १७ ऑगस्ट २०११ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण जाहीर करण्यात आले आहे.तरीही अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
वेळ संध्याकाळची ६,३५ ची माधव भाटले परिसरात एका निवांत स्थळी गांजा चरस याची कॉलेज युवकांना देवाण घेवाण होत असल्याची बातमी आमच्या कानी येताच, वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही त्या परिसरात तडक निघालो मात्र माझी प्रेसची गाडी पाहताच त्या मुलांनी आपापल्या गाड्या काढून त्याठिकाणाहून धूम ठोकली, याबाबत पोलिसांना वारंवार सांगूनही कोणतीही कार्यवाही होत नाही याबद्दल खेद व्यक्त वाटतो, आमचा हा घरातला बाब्या बाहेरच्या लोकांना कारटा कसा काय वाटतो असा प्रश्न त्यांचे आई-वडील विचारत असतील, मात्र घरात सज्जन पणाचा आव आणून वावरणारा आपला मुलगा रात्री बारा बारा वाजेपर्यंत बाहेर थांबून काय करतो? काय दिवे लावतो? याची चौकशी आई-वडिलांनी करणे गरजेचे असते मात्र हेच आई वडील आपला मुलगा किती स्मार्ट आहे असे सांगून त्याची भलावण करतात व त्यातूनच अशा प्रकारचा प्रकारांना अधिक चालना मिळते.
सावंतवाडी शहरात नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गांजा, चरस व नशीले पदार्थांची सहजरीत्या विक्री होत आहे, हेच युवापिढीला घातक आहे, याबाबत आम्ही वारंवार आवाज उठवला होता, मात्र आपली मुले पालकांच्या हाताबाहेर जाऊ लागले आहेत, त्यामुळे पालकांना ही तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे, अकरावी, बारावी शिकणाऱ्या मुलांकडे जर गांजा च्या पुड्या मिळत असतील ही मुले देशाचे भविष्य काय घडवणार हा माझ्या सारख्याला पडलेला एक प्रश्न आहे, व हीच मुले एकत्र येऊन अवैध दारूच्या गाड्यांचे सारथ्य करत असतील तर भावी पिढी कशी असेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
अनेक कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवकांचे अकाली निधन होत आहे या मृत्यूची कारणे शोधली असता तर त्याच्या मागे गोव्यातील विषारी दारू चरस गांजा याचा समावेश आहे. टकाटक कपडे घालून रस्त्यात उभे राहून काका म्हणून हाक मारल्यावर कॉलेज युवतीला एका बंद पुडीतून काहितरी दिले जातेव ही घटना घटना माझ्यासमोर घडल्यावर मी त्या दुकानदाराला विचारलं या मुली आता तुझ्याकडून काय घेऊन गेल्या त्यावेळी दुकानदार बोलला त्या मुली मेन्थॉल सिगारेट घेऊन गेल्या म्हणजे उच्च घराण्यातल्या मुली सुद्धा आता नशा करू लागल्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
सावंतवाडी शहरातील महादेव भाटले, नरेंद्र डोंगर, हेल्थ फार्म परिसर या भागात अशा प्रकारचे काम केले जातात, या परिसरात बियरच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या ,यांचा खच पडलेला आहे ,सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे धूम्रपान करणे हा कायदेशीर गुन्हा असताना पोलिस डोळेझाक करत आहेत.
‌रस्त्यावर उभे राहून वाहनचालकांना त्रास देण्यापेक्षा अशाप्रकारचे समाज विघातक कृत्य करणाऱ्यांना त् कारवाई होणे गरजेचे आहे असे आमचे ठाम मत आहे, पोलिसांनी बाबू, भावड्या, पक्या, बाब्या ,मामू, फेकू , अशा म्होरक्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून खरी माहिती काढून घेणे गरजेचे आहे, सिंधुदुर्ग जिल्हा नशील्या पदार्थांच्या जाळ्याकट चालल्याचे ही सगळी जिवंत उदाहरण आहेत म्हणून वृक्षाच्या मुळाशी घातला तर फांद्या आपोआप खाली येतील या म्हणीप्रमाणे याचा मुख्य मूर्ख आहे त्याला जेरबंद करणे गरजेचे आहे पोलिसांनी त्या दृष्टीने कार्यवाही करणे गरजेचे बनले आहे नाहीतर हे गो ही लोन प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही असे आम्हाला वाटते
संयुक्त राष्ट्राने सन १९८७ पासून अमली पदार्थ हा विषय महत्वाचा मानला आहे. भारतात नार्कोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉपिक सबटंन्स अॅक्ट १९८५ (एनडीपीएस) हा अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे. मालद्वीप सरकारने संयुक्त राष्ट्रांना मादक पदार्थांच्या संबंधित संमेलनासाठी अनुमोदन दिले आणि पहिले अंमली पदार्थावर आधारित संमेलन १९६१ झाले. दुसरे संमेलन १९७१ मध्ये अवैध सायकोट्रापिक पदार्थ यावर झाले. गैरकानुनी धंद्याच्या विरोधात १९८८ मध्ये तिसरे संमेलन झाले.
या कायद्यांतर्गत अमली वस्तू किंवा औषधाचे उत्पादन, वितरण, सेवन, विक्री, वाहतूक, साठा, वापर, आयात निर्यात यावर देशात बंदी आहे. प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय विभागाने उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. राज्यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांनी 26 जून या दिवशी आपल्या परिसरातील शाळा व स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. गावात / शाळामधून अमली पदार्थ विरोधी फेरी काढणे, अमली पदार्थावर बंदी याविषयी निबंध स्पर्धा आयोजित करणे, व्यसनमुक्ती हीच राष्ट्रभक्ती याविषयी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे, अमली पदार्थावर पथनाट्याचे आयोजन करणे, अमली पदार्थ विरोधी जनजागृती करणे, अमली पदार्थाच्या सवयी सोडविण्यासाठी या दिवशी निर्धार प्रतिज्ञा देणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शिवाय अमली पदार्थाच्या विरोधी काम करणाऱ्या व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटना यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी मदत करावयाची आहे, याबाबतचे शासन परिपत्रक 19 जूनला पारित झाले आहे.
अमली पदार्थ ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस(हशिश) वगैरे पदार्थाचा मादक पदार्थात समावेश केला जातो. ब्राऊन शुगर,झंडूबाम रुमालावर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जात आहे. यापुढेही जर श्रीमंत लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा
(मेफेड्रॉन) वापर होऊ लागला आहे. व हे लोण आता सिंधुदुर्गात पोहचले आहेत, त्यामुळे पालकांनी सावध राहावे अशी आमची विनंती आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!