.सळसळत्या रक्ताचा लढवय्या वृत्तीचा जाबाच नेता-संदेश पारकर

_*🛑.सळसळत्या रक्ताचा लढवय्या वृत्तीचा जाबाच नेता-संदेश पारकर* *_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*

*🎴सावंतवाडी, दि- :-१४*
संदेश पारकर हे नेतृत्व म्हणजे आजही युवाईच्या गळ्यातील ताईत,युवकांचे प्रेरणास्थान,व राजकारणातील धगधगता निखारा म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारण करत असताना अनेक चढ उतार संदेशने अनुभवले आहेत, पण संदेश कधीही खचून गेला नाही, असे हे धैर्यशील नेतृत्व,आजही जिल्ह्यातील प्रत्येक गावात संदेशचा कार्यकर्ता आहे,त्याला माणनारा वर्ग आहे,
त्या काळात काही राजकीय चूका संदेश पारकर यांच्या कडून झाल्या नसत्या तर हे नेतृत्व आज जिल्ह्यातील एक नंबरचे नेतृत्व असले असते ,संदेश पारकर यांनी त्यावेळी जे काही राजकीय निर्णय घेतले त्याला त्यावेळची परिस्थितीही तेवढीच जबाबदार होती.
राजकारणात संदेश पारकर पुढे येऊ नये म्हणून त्याच्या विरोधात कटकारस्थाने रचली गेली, वरीष्ठ नेत्यांचे कान भरण्यात आले व पंख कापण्याचे काम त्यांच्या स्वकीयांनिच केले, सततची होत असलेली घुसमट सहन न झाल्याने संदेश पारकर यांनी त्यावेळी जो राजकीय निर्णय घेतला तोच त्यांना घातक ठरला, राजकीय कुरघोडी करून संदेश पारकर यांचे पंख छाटण्याचे काम त्यावेळी झाले नसते तर आज जिल्ह्याच्या राजकारणात संदेश पारकर यांचे नाव अग्रस्थानी असते एवढी प्रचंड युवाईची फौज ,हव्या त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद, महत्वाकांक्षा ,जिद्द ,त्याच्या नसनसात भिनली आहे.
आपण जे करत आहे त्याचे परिणाम काय होणार याची तमा संदेश पारकर याने कधीच बाळगली नाही,संदेश हा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणा देणारा एक संदेशच होता.
संदेश पारकर सर्व सामान्य माणसासाठी लढणारा लढवय्या कार्यकर्ता आहे, प्रसंगाला पाठ दाखवून पळणारा नाही, म्हणून आजही तो युवाईच्या गळ्यातील ताईत आहे,त्यांच्या समोर अनेक संकटे आली पण त्या संकटातून बाहेर पडून पुन्हा एकदा जोमाने भिडण्याची धमक दाखवत आपले कार्य सुरुच ठेवले.
कै.श्रीधर नाईक हत्याकांड पासूनचा संदेशचा राजकीय प्रवास तोंडात बोट घालायला लावणारा आहे, त्याकाळात एवढे दहशतीचे वातावरण असताना देखील संदेश पारकर कधी डगमगले नाहीत ,त्या कठीण प्रसंगात या युवा कार्यकर्त्यांने कणकवलीत पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले त्यात कै विजय नाईक यांचेही योगदान आहे..
मात्र पक्षासाठी राबराब राबणाऱ्या कार्यकर्त्याला बाजूला सारले गेले,व संदेश पारकर यांचे हजारो अनुयायी दुखावले,पक्षांतराचा निर्णय संदेश पारकर यांनी काही स्वखुशीने घेतला नव्हता त्याची ती त्यावेळची मजबुरी होती, कारन आपले अस्तित्व अबाधित ठेवायचे असेल तर हात पाय हे मारलेच पाहिजे , म्हणून संदेश पारकर यांनी त्यावेळी तो निर्णय घेतला,संदेश याचा तो निर्णय चूकीचा जरी ठरला तरी त्या निर्णया घेण्या खेरीज दुसरा पर्याय त्याच्या जवळ नव्हता
आज संदेश पारकर सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षात आहेत, आपल्या परीने कामही करत आहेत, राजकारणात कधी कोणाला कुठे, कधी, कशी संधी मिळेल हे सांगता येत नाही,कारन नाही परशुराम उपरकर यांना वाटले होते मी आमदार होईन ना राजन तेलींना,हे त्यावेळच्या परिस्थितीने सारे घडवले, त्यामुळे संदेश पारकर भविष्यात आमदार दिसले तर नवल वाटण्याचे कारण नाही कारण त्या मागे त्यांची अपार मेहनत व श्रध्दा और सबुरी ही साईबाबांची शिकवण आहे एवढे मात्र निश्चित
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल परिवाराकडून त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभकामना..
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*

*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*

_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_

*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!