मालिकांचा नंबर लागला पुढचा कोणाचा लागेल लवकरच कळेल -नारायण राणे
कणकवली, दि.२३: माझ्या मुंबईच्या घरावर कारवाई असेल किंवा अन्य त्रास देण्याचे प्रकार असतील. सुरवात त्यांनी केलीय. पण शेवट मीच करणार. मी हटणारा नाही असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिला. तसेच नवाब मलिकांनंतर कुणाचा नंबर हे देखील लवकरच कळेल असे ते म्हणाले.
ओसरगाव येथील महिला भवन मध्ये श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. राणे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार दहा किंबहुना त्या वर्षापूर्वीची प्रकरणं उकरून काढून मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मी योग्य त्या परवानग्या मिळवूनच मालवण आणि मुंबईतील घर बांधलं आहे. मुंबईतील घरामध्ये खिडकीची काम छोटी असावी की मोठी असावी असे किरकोळ आक्षेप मुंबई महानगर पालिकेने घेतले आहेत.
दरम्यान मालवण येथील घराबाबतही मला कुठलीही नोटीस आलेली नाही. तरीही काही माध्यमे चुकीची माहिती देऊन माझी बदनामी करत आहेत. अशी बदनामी करणाऱ्यांविरोधात मी न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही श्री. राणे यांनी दिला. महाविकास आघाडीतील मंत्र्यांने अवैध उद्योग अनेक वर्षापासून चालू होते. ती सर्व प्रकरणं आता उघडकीस येत आहेत. आता नवाब मलीकांचा नंबर लागलाय. त्यानंतर आणखी कुणाचा नंबर असेल हे लवकर