कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

जिल्ह्यात उद्योग येण्यापेक्षा जिल्ह्यातच उद्योजक तयार व्हावेत-केंद्रिय मंत्री नारायण राणे

*🛑जिल्ह्यात उद्योग येण्यापेक्षा जिल्ह्यातच उद्योजक तयार व्हावेत*

*🛑केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग :२४ फेब्रुवारी*
जिल्ह्यात उद्योजक आणण्यापेक्षा या जिल्ह्यात उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री म्हणून मी उद्योग आणले तर आमची लोके तेथे नोकरदार म्हणून काम करतील. परंतु उद्योजक बनले तर मालक बनतील, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथील नव उद्योजकांना संपर्क, संवाद व समनव्य परिषद कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री राणे यांनी तेथेच पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या विभागाचे सचिव बी बी स्वेन, खादी ग्रामीण उद्योग संस्था चेअरमन विनलकुमार सक्सेना व अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री राणे यांनी, आमच्या ६० अधिकारी व यशस्वी उद्योजक यांनी उपस्थित राहत परिषदेला उपस्थित नव उद्योजकांना मार्गदर्शन केले. याला जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योजक निर्माण होऊन येथे समृद्धी येण्यासाठी या परिषदेचा उपयोग होईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे सांगत मंत्री राणे यांनी आमच्या सरकारने ११ करोड रोजगार निर्माण केले. ६ करोड उद्योजक बनविले. या माध्यमातून सर्व राज्यांना समान संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात उद्योजक वाढले ते राज्याचे दरडोई उत्पन्न वाढेल. परिणामी देशाचे उत्पन्न वाढेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले देशाचे दरडोई उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे सांगितले.
२०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र मंजूर
यावेळी बोलताना मंत्री राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एमएसएमई मंत्रालयाने २०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रत्येक प्रकारच्या उद्योगांची माहिती दिली जाणार आहे. कोणत्या उद्योगाला खर्च किती ? कोणती मशीन लागणार ? ती वापरायची कशी ? ही माहिती दिली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत येथील तरुण-तरुणींना उद्योजक बनवायचे आहे. त्याशिवाय ही लढाई थांबणार नाही. यातून जिल्हा सुद्धा समृद्ध करायचा आहे, असे यावेळी मंत्री राणे म्हणाले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

 

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!