आम्ही केंदीय तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरणारे नाही- नवाब मलिक
मुंबई : :राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांची आर्थिक गैरव्यवहार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम
याच्यासोबत जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतानाच मलिक यांच्या अधिकृत
ट्विटर हँडलवरुन एक सूचक इशारा देण्यात आला आहे.
या ट्विटमधून मलिक यांनी असे सूचित केले आहे की, आम्ही केंदीय तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरणारे नाही. तसेच अशा कारवायांपुढे झुकणारही नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयार आहोत.
आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी सीआरपीएफच्या पथकासह नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील नूर मंजील या निवासस्थानी छापा टाकला. त्यानंतर ईडीने त्यांना सकाळी 7.30 वाजता ईडी कार्यालयात नेले. सकाळी 7.45 वाजल्यापासून मलिकांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांच्याकडून ईडी आणि बॅलार्ड पिअर येथील पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरू आहे.