कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसिंधुदुर्ग

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना व जिल्हा परिषद सत्ताधारी भाजप यांच्या अंतर्गत वादात जिल्ह्याचा विकास भरडला

🛑राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना व जिल्हा परिषद सत्ताधारी भाजप यांच्या अंतर्गत वादात जिल्ह्याचा विकास भरडला

🛑लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे विकास निधी परत गेल्यास प्रशासकीय यंत्रणेवर खापर फोडणे अयोग्य  प्रसाद गावडे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,ता.२२- राज्यातील महाविकास आघाडी प्रमुख घटक पक्ष शिवसेना आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सत्ताधारी पक्ष भाजप यांच्या अंतर्गत वादामुळे व आपापसातील मतभेदांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास खुंटला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्या नियोजन मधील कामांची यादी मंजूर झालेली नसेल यानंतर या कामांना मंजुरी मिळणार कधी.. प्रशासकीय मान्यता कधी मिळणार…तांत्रिक मान्यता कधी मिळणार… टेंडर प्रोसेस कधी होणार आणि 31 मार्चपूर्वी हा निधी खर्च कसा होणार हा खरा सवाल आहे. जिल्हा विकासाच्या दृष्टीने सदरची बाब अतिशय ज्वलंत असून लोकप्रतिनिधी निष्क्रिय ठरले आहेत अशी जनभावना निर्माण झाली आहे.निधी परत जाण्याची भीती निर्माण होऊन देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,आमदार, खासदार,जि. प.सदस्य अगदी सुशेगात वावरत आहेत हे खरं दुर्दैव आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक घेऊन विकास कामांना तात्काळ मंजुरी देऊन प्रशासकीय कार्यवाही जलदगतीने करणे लोकप्रतिनिधींकडून अभिप्रेत असताना सेना भाजप च्या भांडणांमुळे जिल्ह्याची विकासकामे रखडली आहेत. लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे  31 मार्च उलटून गेल्यानंतर निधी परत करावा लागला तर अधिकाऱ्यांवर खापर फोडून मोकळे होणार का असा सवाल उपस्थित होतो.आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींवर अन्याय झालेला होता त्यांना न्याय मिळणार तरी कधी..? एकंदरीत या परिस्थितीचा विचार करता जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी वेळीच दखल घेऊन तात्काळ जिल्हा नियोजन बैठक आयोजित करावी आणि सर्व कामांच्या मंजूरीसह तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी आणि निविदा प्रक्रिया या सर्व बाबी जलदगतीने करुन जिल्ह्याच्या विकासासाठी आलेला निधी शंभर टक्के खर्ची घालण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी.

———————————————

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!