आणखीआरोग्यकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जुन्या पेन्शन संघटनेने जपली सामाजिक बांधिलकी

🛑उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी : दि. १२

रक्त तयार करण्याचा ना कोणता कारखाना असतो ना कोणती प्रयोगशाळा, प्राण्यांचे रक्त ही माणसाला देऊ शकत नाही. रक्त तयार होण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे मानवी शरीर. हे रक्त आपल्या शरीरात तयार होते पण सत्कार्यासाठी शक्तीची नव्हे तर माणुसकीची गरज असते. हिच माणुसकी दाखवत म. रा. प्रा. जु. पे. हक्क संघटन शाखा सावंतवाडीच्या वतीने कोरोनाच्या बिकट परिस्थितीत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवून देण्यात आली.

हा उपक्रम उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, येथे मोठ्या दिमाखात पार पडला, या उपक्रमासाठी म.र.जु.पे. हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू वाजराटकर यांनी उपस्थित राहून आपले 63 वे रक्तदान केले.

या रक्तदान उपक्रमात तुषार आरोसकर, सागर खटावकर, राजन खराबे, स्वप्नील नवखरे, अमोल पाटील, विलास राऊळ, अमोल सासवडे, नारायण नाईक, सांदीप निऊंगरे, पांडुरंग होंडे, राजेभाऊ कांगणे, ओमनाथ क्षीरसागर, प्रभाकर घुले, शंकर वजराटकर, वसंत गर्कळ, श्याम देशमुख, प्रल्हाद कांबळे, पांडुरंग पाटील, राकेश देसाई, अमोल कोळी, दत्‍ताराम गावडे, राजन खराबे इ शिलेदारांनी आपले बहुमूल्य रक्तदान केले.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. निंगोजी कोकितकर, सचिव संदिप निऊंगरे, कार्याध्यक्ष अमोल कोळी , सहसचिव सुदाम ढोले , उपाध्यक्ष अतुल खेडकर, उद्देश नाईक, राजकुमार टिपराळे, शिवाजी कवडे, साहेबराव शेवाळे, जिल्हा सदस्य विवेक कुलकर्णी तसेच केंद्र संघटक भुषण पाटील, प्रशांत गुरव, श्याम देशमुख, सचिन भोसले, गोपाळ साबळे, ओम क्षीरसागर, आप्पासो गडदे, राहुल वाघदरे, बामणी ठाकूर, आपया हिरेमठ, राजेभाऊ कांगणे, नितीन काळे, स्वप्नील नवखरे, प्रभाकर घुले, उत्तम पाटील, युवराज टिपे, बापूसाहेब पोटे, अमर पाटील चांद मुंजेवार,गणेश आत्राम, सचिन मानकर,भूषण पाटील,पांडुरंग पाटील,प्रल्हाद कांबळे,विलास आवडण,राहुल वाघदरे, अप्पय्या हिरेमठ, युवराज राठोड इत्यादी शिलेदारांनी मनापासून सहकार्य केले.

शिक्षण विभाग सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी श्रीम कल्पना बोडके आणि विस्तार अधिकारी श्रीम दुर्वा साळगांवकर यांनी शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमास अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी शाखा सावंतवाडी, शिक्षक भारती शाखा वेंगुर्ला, शिक्षक परिषद सिंधुदुर्ग तसेच शिक्षक पतपेढीचे संचालक श्री.प्रमोद पावसकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संघटनेची उद्देश वाटचाल अध्यक्ष निंगोजी कोकितकर यांनी मांडले तर आभार संदिप निऊंगरे यांनी मांडले संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!