महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, लायन्स क्लब, लायन्स गॅलेक्सी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.२४: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा चिपळूण यांच्या संयोजनाखाली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमासाठी लायन्स क्लब चिपळूण, गॅलेक्सी क्लब चिपळूण, तसेच जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांचे विशेष सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरामध्ये पन्नास रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या सर्व रक्तदात्यांच्या चहा नाष्टाची सोय संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. सर्व रक्तदात्यांना गुलाब पुष्प व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी चिपळूण पंचायत समितीच्या सभापती सौ.धनश्री शिंदे, पंचायत समितीचे सदस्य श्री. राकेश शिंदे, श्री. नितिन ठसाळे, गटविकास अधिकारी श्री. विजय राऊत, गटशिक्षणाधिकारी श्री. डी.डी. ईरनाक, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. राज अहमद देसाई, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री. बळीराम मोरे, जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप पवार उपस्थित होते. दिपप्रज्वलन व सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस, वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या शुभेच्छा नंतर प्रत्यक्ष रक्तदान शिबिर सुरू झाले. या रक्तदान शिबिरात शिक्षकांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला. विशेषता महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या या सामाजिक उपक्रमास चिपळूणचे आमदार शेखर निकम, पंचायत समितीचे उपसभापती श्री. पांडुरंगशेठ माळी, लायन्स क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, लायन्स क्लब गॅलेक्सी अध्यक्षा सौ. एकता मुळे, लायन्सचे पदाधिकारी श्री. अरुण कदम, सनी खेडेकर, चिपळूण नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. शशिकांत मोदी, जिल्हा परिषद बांधकाम माजी सभापती श्री. विनोद झगडे, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य श्री. बाळशेठ जाधव, जिल्हा परिषद सदस्य सौ. मीनल काणेकर, अर्बन बँकेचे संचालक श्री. सतीश अप्पा खेडेकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष श्री. योगेश शिर्के, पत्रकार बंधू श्री. राजेंद्र शिंदे, श्री. नागेश पाटील, श्री. संतोष कुळे, श्री. महेंद्र सुर्वे, श्री. बाळू जाधव, पत्रकार व ग्राहक संरक्षण कक्षाचे श्री. संतोष सुर्वे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष कदम, तालुका अध्यक्ष श्री. राजेंद्र महाडिक, केंद्रप्रमुख संघटना जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजी शिर्के, शिक्षक पतसंस्थेचे संचालक श्री. अजय गराटे, श्री. अनंत कदम, श्री. संजय सुर्वे, संचालिका श्रीमती नसरीन खडस, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. मनोज पवार, शिक्षक समितीचे पदाधिकारी श्री. चंद्रकांत जंगम, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. अरुण जाधव, संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष श्री. दिलीप महाडिक यांची उपस्थिती लाभली.
संघटनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत सकपाळ, तालुका सरचिटणीस अमोल भोबसकर यांनी सर्व उपस्थितांचे, रक्तदात्यांचे व संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

