कसाल बस स्थानक बनले खाजगी वाहनांचे पार्किंग तळ
🛑कसाल बसस्थानकात खाजगी गाड्यांचे पार्किंग कायम
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल : दि. १२
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी आगाराची बससेवा हळूहळू चालू होत आहे. मात्र कसाल बसस्थानक आवारात पार्किंग होणाऱ्या खाजगी गाड्या तेथून हटण्याचे नाव घेत नाहीत . गुरुवारी आठवडा बाजार या दिवशी कसाल बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने पार्क करून ठेवण्यात आली होती .या खाजगी वाहनांचे पार्किंग एसटी बसेसना अडचणीचे ठरत आहे .एसटी प्रशासन या खाजगी वाहनांना बसस्थानक आवारात अटकाव कधी करणार ? असा सवाल नागरिक व प्रवासी वर्गामधून म्हणून उपस्थित होते आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी गेले दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे एसटी स्थानकामध्ये प्रवाशांची आणि एसटी गाड्यांची वर्दळ कमी झाली .मात्र आता हळूहळू तुरळक प्रमाणात एसटी बसेस सुरू झाले आहेत, प्रवाशांचीही तुरळक वर्दळ सुरू झाली आहे. दरम्यान संपकाळामध्ये कसाल बसस्थानकात परिसरात खाजगी वाहनांचे पार्किंग पॉईंट बनले आहे.
शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असलेले कसाल एसटीबसस्थानक खाजगी वाहनांनी तेथे आपले अघोषित वाहनतळ करून टाकले आहे. अनेक नागरिक आपल्या खाजगी कामानिमित्त गाड्या घेऊन शहरात फिरत असतात. मग अशा मोकळ्या जागी वाहने पार्किंग केली जातात तसेच पार्किंग स्थळ या वाहनांना बसस्थानकाचा आवार बनला आहे. एसटी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्किंगकडे एसटी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

