कृषिराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडी

शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या; शिवाजी जंगले

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि.२०: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी उध्वस्त झाला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली असून यासाठी पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर आज दिनांक २० ऑक्टोंबर २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यापूर्वी झालेल्या नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही जमा न झाल्यामुळे ती भरपाई सुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशा मागणीचे निवेदन यावेळी प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले.

या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजी जंगले, तालुकाप्रमुख संजय गावडे, उपशहर प्रमुख प्रकाश देसाई, सोनू खरवत, महादेव कोळेकर, गंगाराम खरवत, बाबू झोरे, धाकू जंगले, दत्ताराम जंगले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनाला शेतकरी नेते मंगेश तळवणेकर यांनी सुद्धा आपला पाठिंबा दर्शवला आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!