पी.डी. नाईक राजकीय घरण्याचा शेवटचा वारसदारही काळाच्या पडद्याआड..
कै. पी.डी. नाईक यांचा मुलगा बाळू नाईक याचे निधन..
🖥️ Kokan Live Breaking News
सावंतवाडी,दि.०४: सबनीसवाडा दत्त मंदिर येथील समाजवादी पक्षाचे नेते (पुर्वीचा जनता पक्ष) कै. पी.डी. नाईक यांचा मुलगा बाळू नाईक याचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
बाळू नाईक गेले अनेक महिने अंथरुणावर होता. ऐके काळी पी.डी. नाईक यांचे घर जनता दलाच्या नेतेमंडळींनी गजबजलेले असायचे, अर्थमंत्री कै. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, प्रमिलाताई दंडवते यांचे त्यांच्या घरात येणे-जाणे होते. पी.डी. नाईक यांच्या निधनानंतर या कुटुंबाचा आधारच तुटला होता .
काही वर्षांपूर्वी नाईक यांचे कोसळलेले घर डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांनी पन्नास हजार रुपयांची मदत करुन दुरुस्त करून दिले होते. आज त्या घराचा एकुलत्या एक वारसदारही काळाच्या पडद्याआड गेला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

