अपहार करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास महाराष्ट्र सायबर विभागाने केले जेरबंद..
▪️छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे वाचवण्यात यश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि.२०: ऑनलाईन पेटीएम अपहार करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास महाराष्ट्र सायबर विभागाने जेरबंद केले. यामुळे छोटे व्यापारी आणि शेतकऱ्याचे कष्टाचे पैसे वाचवण्यात यश आले असल्याची माहिती सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली आहे.
यासंदर्भात दि. ०५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अंधेरी भागातील दुग्ध व्यावसायिक राजेश मनसुख पटेल यांनी महाराष्ट्र सायबरकडे तक्रार केली की, दि.२० ऑगस्ट २०२० आणि दि. २० सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्या पेटीएम अकाउंट मधून त्यांचे अपरोक्ष ५० हजार ४४८ रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेतले आहेत.
तक्रारीवरुन नोडल सायबर पोलीस ठाणे, महाराष्ट्र सायबर, येथे भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चे कलम ४३ (अ),६६, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होतात घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नोडल सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्ह्याशी संबधीत बाबींची तपासणी, अभ्यास करून तांत्रीक पद्धतीने तपास करत संशयीत आरोपी मोहम्मद मुन्ना, पाशिउद्दीन अन्सारी, वय २५ वर्षे, व्यवसाय-फिल्ड सेल्स एक्झिकेटीव्ह, यास तात्काळ अटक करण्यात आले. आरोपीने इतरही व्यावसायिकांचे पेटीएम अकाउंटचे पासवर्ड चोरून ते गैरकामासाठी वापरल्याचे पुढे येत आहे.
नागरिकांना महाराष्ट्र सायबरतर्फे आवाहन करण्यात येते की, छोट्या व्यावसायिकाचे मर्चंट वॉलेट अकाउंट उघडून देण्याच्या, तसेच त्यांचा पासवर्ड सेट करून देण्याचे बहाण्याने त्यांचा पासवर्ड स्वतःकडे घेवुन अशा मर्चंट वॉलेटचा वापर नंतर आर्थिक अपहाराकरिता करण्यात असल्याचे समोर आले आहे. सर्व लहान मोठ्या मर्चंट वॉलेटच्या ग्राहकांना सुचित करण्यात येते की, त्याच्या मोबाईल क्रमांकांचे मर्चट वाँलेट खाते इतर कोणी वापरत नाही ना? याची खात्री करून आपला पासवर्ड स्वतः बदलून तो स्वत: पुरता मर्यादित ठेवावा व सतत बदलत राहावा.
कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, पोलीस उपमहानिरीक्षक हरिश बैजल, पोलीस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपुत, पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उप अधीक्षक विजय खैरे, यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश सरदेसाई, सहा-पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, पो. हवा. विश्वास मोहिते, पो. शि. हर्षल रोकडे, शैलेश साळुंखे, पो. शि. निलेश जंगम, पो. शि. शाम हगवणे यांनी केली आहे.
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

