आरोग्यकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आजगावच्या शैलजा पांढरे यांना ‘दिव्यांग नव साहित्यिक पुरस्कार’ प्रदान..

🛑आजगावच्या शैलजा पांढरे यांना ‘दिव्यांग नव साहित्यिक पुरस्कार’ प्रदान..

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी- ऑनररी कॅप्टन आबा पाटील फाउंडेशन पुरस्कृत राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, शाखा सिंधुदुर्ग यांचा ‘दिव्यांग नव साहित्यिक’ जिल्हास्तरीय पुरस्कार ‘पुरस्कार आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमांतर्गत पुरस्कार विजेत्या शैलजा पांढरे यांचे घरी जाऊन प्रा.रुपेश पाटील व बाळासाहेब पाटील यांच्या यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी महासंघाचे जिल्हा सहसचिव लहू रगजी, जिल्हा सहखजिनदार वसंत शिरसाट, जिल्हा कमिटी सदस्य एकनाथ हरमळकर, रवींद्र सरमळकर, चंद्रकांत पांढरे व सौ.पांढरे उपस्थित होते.
यावेळी मुख्य अतिथी प्रा. रुपेश पाटील म्हणाले की, कॅप्टन आबा पाटील फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे हे अभिनव पुरस्कार म्हणजे ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’, हे ज्ञानदेवांचे स्वप्न पूर्ण करणारा उपक्रम आहे. आपल्या अंगी असलेल्या अपंगत्वाला विसरून ही सर्व पुरस्कारप्राप्त मंडळी आगामी काळात स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा नवा इतिहास घडवतील, आणि समाजात दिव्यांग म्हणजे भगवंताची जगावेगळ्या कार्यकर्तृत्वाची देणगी आहे ,असा नावलौकिक मिळवतील, असेही प्रा.रुपेश पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना शैलजा पांढरे यांनी सांगितले की, साहित्य क्षेत्रातील जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मला नवीन प्रेरणा मिळाली असून आगामी काळात माझ्याकडून अधिक दर्जेदार लेखन होईल, अशी मी ग्वाही देते तसेच पुरस्कार दिल्याबद्दल कॅप्टन आबा पाटील फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानते, अशी बोलकी प्रतिक्रिया शैलजा पांढरे यांनी दिली.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!