कुडाळराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

अवकाळी पावसाच्या माऱ्याने शेतीचे नुकसान तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना सदोष बियाण्यांचाही बसलाय फटका; जिल्ह्यातील शेतीची बिकट अवस्था

▪️राज्यकर्त्यांचे शेतीच्या बांधावरील पाहणी दौरे आटोपले असतील तर नुकसान भरपाई नेमकी किती देणार ते जाहीर करावे..

▪️गतवर्षी प्रमाणे गुंठ्याला ८० रुपये मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा करणार का; मनसेचा सवाल

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर*

🎴कुडाळ,दि.२०: ‘इडा पीडा टळू दे अन बळीचं राज्य येऊ दे’ या आशेवरच बळीराजा आजपर्यंत जगण्यासाठी धडपडतोय अशी परिस्थिती आहे. अगदी टोकाचा संघर्ष करून देखील पदरात काहीच पडत तर नाही. शिवाय शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर करून जणू थट्टाच केली जाते, असे चित्र आहे. गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र शासनाने गुंठ्याला ८० रुपये मदत करून शेतकऱ्यांची चेष्टा केली होती. यावर्षी तर अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शासनाचे कर्मचारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करत आहेत. परंतु महाराष्ट्र शासन नुकसान भरपाई नेमकी किती देणार आहे. याबाबत राज्यकर्ते बोलायला तयार नाहीत. त्यामुळे आघाडी सरकारच्या शेतकऱ्यांबाबतच्या भूमिकेबद्दल साशंकता उपस्थित होत आहे. मागील वर्षीची तुटपुंजी मदत देखील अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. याचा जाब शेतकऱ्यांनी राज्यसरकरच्या प्रतिनिधींनी विचारणे काळाची गरज आहे.

या शिवाय यावर्षी भात पिकाच्या सदोष बियाण्यांमुळे ‘काळा नेर’ उगवल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत कृषी सेवा केंद्र प्रतिनिधींना विचारणा केल्यावर थातूर मातूर उत्तरे देऊन जबाबदारी टाळण्याचे प्रकार घडलेले आहे. याबाबत कृषी विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष वेधून संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारे सदोष बियाण्यांचा अनुभव आल्यास मनसेशी संपर्क साधावा. मनसे आपल्या पूर्णपणे पाठीशी असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत सदरील प्रकरणांचा शासन स्तरावर पाठपुरावा करेल अशी ग्वाही मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!