१९७१ इंडो पाक युद्ध विजय दिवस सुवर्णमहोत्सव म्हणून साजरा
*🛑१९७१ इंडो पाक युद्ध विजय दिवस सुवर्णमहोत्सव म्हणून साजरा*
*🛑सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त संघ व आजी-माजी सैनिक महिला बचत गटाच्या महासंघाच्या पुढाकाराने उद्या सोमवार दि.१३ डिसेंबर रोजी हा विजय दिवस साजरा होणार*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी,दि,:-१२ डिसेंबर*
१९७१ इंडो पाक युद्ध विजय दिवस सुवर्णमहोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या युद्धात सहभागी झालेल्या जिवंत विजयी योद्ध्यांचा सन्मान शासनाकडून होईल या अपेक्षेने आम्ही गप्प होतो. मात्र तसे झालेले नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त संघ व आजी-माजी सैनिक महिला बचत गटाच्या महासंघाच्या पुढाकाराने उद्या सोमवार दि.१३ डिसेंबर रोजी हा विजय दिवस साजरा करत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघ जिल्हाध्यक्ष तातोबा गवस यांनी माहिती दिली. यावेळी गजानन तेजम, दीपक शिर्के, रुपेश आईर, दिगंबर नाईक, संजय सावंत, संजय नाईक, माजी नगरसेवक राजू मसुरकर यावेळी उपस्थित होते
सावंतवाडी येथील सैनिक कल्याणच्या विद्यार्थी वसतिगृह येथे १९७१ इंडो पाक विजयी सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम साजरा केला जात आहे. १९७१ च्या युद्धात पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. ३ ते १७ डिसेंबर या कालावधीत हे युद्ध झाले होते.स्वातंत्र्याला ७५ वर्ष म्हणजे अमृतमहोत्सव आणि १९७१ च्या युद्धाला पन्नास वर्षे म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष यांचा समन्वय साधत सुवर्ण महोत्सवी योद्धे आणि शहीदांच्या पत्नींना सन्मान केला जात जाईल. युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांना देशाने हिरो ठरविले होते मात्र हे हिरो आज जीवन कसे जगत आहेत, हे समाजासमोर यायला हवे असे ते म्हणाले
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २५० ते ३०० विजयी योध्दे आहेत.१९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी विजयी योद्धे कोण, सैनिक कोण हे समाजाला कळले पाहिजे म्हणून सावंतवाडी शहरातून उद्या सोमवारी सकाळी दहा वाजता प्रभातफेरी काढली जाईल तसेच या कार्यक्रमास जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी,जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित राहतील तसेच माजी सैनिकांचे मार्गदर्शक सैनिक फेडरेशनचे राज्य अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, कमांडर ऑफिसर कर्नल लेकराज दास हे उपस्थित राहतील, असे ते म्हणाले.
१९७१ च्या युद्धात सहभागी झालेले सैनिक ५० वर्षानंतर जिवंत आहेत अशा जिवंत सैनिकांचा सन्मान व्हायला पाहिजे. शासनाचा सैनिक कल्याण विभाग फक्त शहिदांच्या विधवांचा सन्मान करतो. मात्र या ठिकाणी जिवंत सैनिक आणि शहीद यांच्या विधवा पत्नींचा सन्मान करण्यात येईल तसेच सैनिकांच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सावंतवाडी नगर परिषदेने जागा देऊ केली आहे त्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा देखील सन्मान केला जाईल असे ते म्हणाले
वैभववाडी देवगड मालवण तालुक्यामध्ये सैनिकांची माहिती संकलन होण्याची गरज आहे ती होत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. सैनिक कल्याण विभागाने युद्धामध्ये सहभागी झालेल्या सर्व सैनिकांची माहिती संकलन करायला हवी. पन्नास वर्षांपूर्वी युद्धात सहभागी सैनिक जिवंत आहे त्यांचा सन्मान सरकार किंवा समाजाकडून होईल अशी अपेक्षा होती तसा झाला नसल्याने आमच्या संघटनेला पुढाकार घ्यावा लागला तसे तातोबा गवस यांनी बोलताना सांगितले
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
,*सर्व ग्राहकांना खुश खबर*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

