‘काच के घरो में रहने वाले, दुसरो के घरो पे पत्थर फेका नही करते’
स्थानिक आणि बाहेरचे असा वाद करणं हेच भाजपचं काम आहे. भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी स्थानिक आणि परप्रांतीय या विषयावर बोलणं हाच मोठा विनोद आहे. ‘काच के घरो में रहने वाले, दुसरो के घरो पे पत्थर फेका नही करते’ त्यामुळे स्थानिक व परप्रांतीय यावर बोलणं अजय गोंदावळे टाळावं. ज्यांच्या जीवावर मडुऱ्यातल्या नेत्यांना शहरात निवडून दिलं ते मतदार परप्रांतीय कसे ? याचा खुलासा देखील करावा. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आठवडा बाजारावर केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नये. फुटपाथवरील आठवडा बाजाराचा ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. याठिकाणी महिला, वृद्ध यांना गटारात उभं राहून बाजार करावा लागतो. यात त्यांना शारीरिक ईजा, अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे अजय गोंदावळे यांनी विपर्यास करून व्यापारी, नागरिकांची दिशाभूल करू नये. पुंडलिक दळवी हे व्यापारी असून त्यांना व्यापाऱ्यांची भावना जवळून माहित आहे. आठवडा बाजाराच विकेंद्रीकरण झाल्यानं त्याचा फटका फिरत्या व्यापाऱ्यांसह, स्थानिक व्यापारी, रिक्षावाले यांना याचा फटका बसतो. शहरातील स्थानिकांच्या अर्थचक्रावर याचा परिणाम होतो असं मत राष्ट्रवादी उद्योग व व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान यांनी व्यक्त केले.

