७२० दिवसांच्या नगराध्यक्षांना पुंडलिक दळवींची दखल घ्यावी लागली-संतोष जोईल
३६५ दिवसांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची ७२० दिवसांचे नगराध्यक्ष संजू परब यांना दखल घ्यावी लागली हेच राष्ट्रवादीच यश आहे. राजकारणात नवीन असले तरी गेली १५ वर्ष ते समाजात कार्यरत आहेत.आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच दोन वर्षांतील अपयश घेऊन सामोरे जाणार असल्याच पुंडलिक दळवी यांनी सांगितल्याने सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळेच आज पत्रकार परिषद घेत २ वर्षांत काय दिवे लावले ते सांगण्याची वेळ नगराध्यक्षांवर आली. २ वर्षात काय केले हे जनतेला सांगाव लागतंय हेच सत्ताधाऱ्यांच अपयश आहे. विकासकाम आम्हीच केली असं सांगणाऱ्या भाजपने ही काम माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कारकिर्दीत मंजूर होती याचीही नोंद घ्यावी. शहरात होणाऱ्या कंटेनर थिएटरसह पोटनिवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच काय झालं ? हे देखील त्यांनी जनतेसमोर जाहिर कराव. नव्या घोषणा करण्याआधी जुन्या आश्वासनांच काय झालं याचही आत्मपरीक्षण कराव. कमळे कुठे उगवतात हे आम्हाला चांगलेच ठावूक आहे. त्याचे धडे आम्हाला बालवाडीतच मिळाले आहेत. परंतु स्वच्छ, सुंदर मोती तलावात उमलणारी कमळ ही तलावातील वाढत्या घाणीच्या साम्राज्याच उदाहरण आहे. त्यामुळे कमळ कुठे उगवतात हे सांगण्यापेक्षा तलावात घाणीच साम्राज्य कस निर्माण झाल ? याचा अभ्यास टीका करणाऱ्या नगरसेवकांनी करावा आणि नंतरच बोलाव अस मत राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल यांनी व्यक्त केले.

