स्वच्छता अभियानात देशात ६७ व्या स्थानी असलेली सावंतवाडी नगरपालिका २५५ व्या स्थानी गेली हे सत्ताधा यांचे अपयश-बबन साळगावकर
*_🛑स्वच्छता अभियानात देशात ६७ व्या स्थानी असलेली सावंतवाडी नगरपालिका २५५ व्या स्थानी गेली हे सत्ताधा यांचे अपयश-बबन साळगावकर.*
*_🛑 स्वच्छतेबाबत सावंतवाडी वासीय सहकार्य करत नाही असे बोलणे म्हणजे शहरवासीयांचा अपमान*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴सावंतवाडी,दि,:-२१नोव्हेंबर*
स्वच्छता अभियानात देशात ६७ व्या स्थानी असलेली सावंतवाडी नगरपालिका २५५ व्या स्थानी गेली हे सत्ताधा यांचे अपयश आहे. त्यामुळे आत्मचिंतन करण्याची गरज असताना तुम्ही तुमचीच पाठ थोपटून घेताय, म्हणजे आश्चर्य आहे. असा टोला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी लगावला. दरम्यान शहरातील जनता स्वच्छतेसाठी पालिकेला सहकार्य करत नाही, असे सांगून स्वच्छतेत नापास झालेल्या सत्ताधारी व विरोधकांनी सावंतवाडीकरांचा अपमान केला आहे. ही बाब गंभीर व निषेधार्ह आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत श्री.साळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी देशात ६७ व्या स्थानी असलेली नगरपालिका २५५ व्या स्थानी कुठे नेऊन ठेवली आहे. हे नगरपरिषदच्या हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे, असे मी समजतो. कारिवडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा सुमारे साडेपाच कोटी रुपयाचा आहे. यात २ कोटी ७४ लाख रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी आहेत. माझ्या कार्य काळामध्ये ४८ लाख रुपयाचे चिरेबंदी कुंपण पूर्ण झाले होते. १९ लाख रुपयाचे गेट आणि लॅडस्केपिंग वेट ब्रिज ८००० स्क्वेअर फिट फॅक्टरी शेड खर्च सुमारे दोन कोटी रुपये ९० टक्के हे काम पूर्ण झाले होते. या प्रोजेक्ट वरती सात वर्षांपूर्वी ८० नारळाची झाडे लावली आहेत. १६० सुपारी तसेच आंतरपीक म्हणून लिंबू झाडे प्रोजेक्ट पुढे तुम्ही पूर्ण करू शकला नाही, जे काही मार्क मिळतात राज्यामध्ये दिसतायत ते या केलेल्या कामामुळे असा दावा त्यांनी केला आहे. आज शहरांमध्ये ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला कचरा दिसत आहे. एक स्वच्छ सुंदर शहर दोन वर्षांमध्ये कीती बकाल झाले हे शहरवासीयांनी अनुभवले आहे. आज पर्यंत याच शहरवासीयांनी सहकार्य करून अनेक स्वच्छता अभियान राबविण्यासाठी मला व नगरपरिषद त्याला सहाय्य केले. आणि नगर परिषद ६७ व्या स्थानी आणण्यासाठी याच नागरिकांनी मदत केल्यामुळे यश हे सर्व यश संपादित करता आले. हे सर्व सावंतवाडीतील सुजाण नागरिकांना मुळे शक्य झाले. २५५ व्या स्थानी शहर नेऊन पाठ थोपटून घेत आहेत अशी टीका केली.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !
*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )
*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा
*🚴♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत
*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*
*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*8108285128 | 9421269525 | 7083235822*
#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

