राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मुंबई येथील निवास्थानावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध-बबन साळगावकर
राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी झालेला हल्ला निंदनीय असून त्याचा मी तीव्र निषेध करतो असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी किती हीन दर्जाची होत चाललेली आहे याचे उदाहरण आज आपल्याला या कृत्यातून पाहायला मिळाले आहे सत्तेसाठी वखवखलेले पुढारी या कटामध्ये सहभागी आहे याची उच्चस्तरीय चौकशी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने करावी अशी मागणी साळगावकर यांनी केली.
काल झालेल्या मुंबई येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषण देऊन आजचा हा प्रकार घडून आणला आहे या साठी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.
पवार साहेबांच्या सिल्वर ओक निवासस्थानी हल्ला करणारे खरे एसटी कर्मचारी होते की भाडोत्री गुंड होते याची चौकशी व्हावी असेही साळगावकर म्हणाले.
कोण हा गुणरत्न सदावर्ते कालच्या सभेमध्ये एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन विषयाचे विषयांतर करणारा हाच वकील मराठा आरक्षणाला विरोध करत होता.
एसटी कर्मचाऱ्यांना आमचाही पाठिंबा होता त्यांचा मागण्या पुर्या व्हाव्यात यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत होतो परंतु पुढे काही दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचा राजकारणासाठी वापर सुरू झाला विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आपल्या स्वार्थाकरिता राजकारणासाठी वापर करून घेतला या सहा महिन्यांमध्ये जवळ जवळ 100 पेक्षा जास्त कर्मचारी गमवावे लागले हे विरोधी पक्षाच पाप आहे अशा तीव्र भावना साळगावकरांनी व्यक्त केल्या.
कर्मचाऱ्यांना भडकावून एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आव्हान करून विरोधी पक्षाकडून आशा दाखवली जात होती तसेच कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे याचाहि मी तीव्र निषेध करतो.
चुकीच्या लोकांच्या हातामध्ये संपाचे नेतृत्व गेल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे आता याच खापर आपल्यावरती फुटणार म्हणून काल झालेल्या सभेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषण देऊन ही दंगल घडवून आणली आहे अशा वकिलावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत साळगावकर यांनी व्यक्त केले.