कोकणरत्नागिरीराजकीय

वादग्रस्त वक्तव्य राणेंना भोवले.. रत्नागिरी पोलिसांनी केली अटक

_*🛑 वादग्रस्त वक्तव्य राणेंना भोवले.. रत्नागिरी पोलिसांनी केली अटक*_

*🛑 नाशिक पोलिसांच्या देणार ताब्यात,जामिन आज की उद्या याकडे लक्ष*

*🛑 रत्नागिरी पोलीस अधिक्षकांनी राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच घेतले ताब्यात*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 रत्नागिरी, दि- :-२४ऑगस्ट*

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक राणेंच्या घरी पोहोचले. राजशिष्टाचाराचे सर्व उपचार पाळल्यानंतर पोलिसांनी राणेंना अटक केली. राणेंना रत्नागिरी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर कागदपत्रांचं सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे.

कोर्टात आज की उद्या?

राणेंना नाशिक पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्यांना नाशिकच्या किंवा रत्नागिरीच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. मात्र, राणेंना आज कोर्टात हजर करणार की उद्या याबाबतची माहिती मिळू शकली नाही. राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना आजच नाशिक कोर्टात उपस्थित केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बंद खोलीत फक्त पोलीस आणि राणे

राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस राणेंच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर त्यांनी राणेंना काही कागदपत्रं देण्यात आली. यावेळी पोलीस आणि राणेच फक्त खोलीत होते. भाजपच्या सर्व नेत्यांना आणि राणेंच्या सुरक्षा रक्षकांना खोलीबाहेर ठेवण्यात आलं होतं, अशी प्राथमिक माहिती मिळते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!