नळयोजना व पथदिवे यांचे कनेक्शन तोडल्यास आंदोलन
_*🛑 नळयोजना व पथदिवे यांचे कनेक्शन तोडल्यास आंदोलन..*_
_*🛑 कुडाळ शिवसेना सरपंच संघटनेचा महावितरणला इशारा..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴कुडाळ, दि-२७ :-* तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे व पथदिव्यांची वीज कनेक्शन बंद करू नये अन्यथा रस्त्यावर उतरून उपोषण आंदोलन केले जाईल याला सर्वस्वी महावितरण विभाग जबाबदार राहील असा इशारा कुडाळ तालुका शिवसेना सरपंच उपसरपंच संघटनेने अध्यक्ष सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली महावितरण विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे मंगळवारी कुडाळ एमआयडीसी येथे महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली पाणी पुरवठा व पथ दिव्यांची थकबाकी चे कारण पुढे करुन महावितरण ग्रामपंचायतींचे पथ दिवे व पाणी पुरवठा विजपुरवठा खंडीत करीत आहे. , तालुक्यातील आपल्या वेगवेगळ्या उप विभागामर्फत ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा व पथ दिव्यांचे विज कनेक्शन बंद करण्याचे उपद्व्याप सुरु आहेत. पथ दिव्यांची मागील सर्व 31 मार्च 2018 पर्यंतची थकबाकी ही राज्य शासनाने भरावी व 31 मार्च 2018 नंतर आस्थापीत झालेल्या म्हणजे नवीन कनेक्शन झाले असल्यास त्याची बाकी ग्रामपंचायत ने भरावी असा शासन निर्णय झाला आहे तसेच यापूर्वी ही राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीच्या हिश्यातील 14 व्या वित्त आयोग मधील चार हप्त्यातून 1370 कोटी रुपये आपल्या महावितरण कंपनीस दिले आहेत त्याचा आपण अद्याप हिशोब दिला नाही कोणत्या ग्रामपंचायतींचे किती पैसे बाकी होते, कधी पासुन होते याचा काहीही ताळमेळ दिला नाही असे असताना आपल्या विभागा मार्फत ग्रामपंचायतीचे कनेक्शन तोडण्याचे उपद्व्याप सुरु आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठा व पथ दिव्यांचे कनेक्शन तोडु नये व तोडले असल्यास ते तात्काळ चालु करावे तसेच तोडण्याची कार्यवाही झाल्यास उपोषणात्मक आंदोलन संदर्भात कोणताही पत्रव्यवहार न करता तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांना एकत्र करून आपल्या विरोधात सिंधुदुर्ग विभागीय कार्यालया समोर उपोषणात्मक आंदोलन करण्यात येईल. या कालावधीमध्ये तालुक्यातील ग्रामिण भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडली तर याची सर्वस्वी जबाबदारी आपली असणार आहे असे निवेदनात म्हटले आहे.
*………………..👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻⚕️*
सस्नेह नमस्कार.🙏
_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_
क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त
*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*
जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.
👨🏻⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट
💉Reg. No. 68484
🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*
*👨🏻⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.
*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार
*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*

