🛑 जि. प केंद्रशाळा साटेली – भेडशीत भक्तीमय वातावरणात सरस्वती पूजन..
🛑 विद्यार्थ्यांच्या अभंग गायनाने दुमदुमली शाळा..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१३ :- कोरोना महामारी मुळे बंद असलेली शाळा नुकतीच दिड वर्षा नंतर सुरु झाली आहे.त्यामुळे मुलांचा उत्साह पाहण्याजोगा होता. सरस्वती पूजना निमित्त जि. प केंद्रशाळा साटेली – भेडशी मध्ये भक्तीमय वातावरणात सरस्वती पूजन साजरे करण्यात आले. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मधुर अशा स्वरांमध्ये अभंग गायन केले.
तब्बल दोन वर्षा नंतर शाळेत आलेल्या मुलांच्या चेहर्यावर ओसंडुन वाहणारा आनंद यावेळी पाहण्याजोगा होता.
सर्वच विद्यार्थी यावेळी सरस्वती मातेच्या भक्तीत लिन झालेले पहावयास मिळाले
दरवर्षी गावातील ग्रामस्थांकडून भजन केले जायचे मात्र यावेळी कोरोनामुळे कार्यक्रम करण्यास बंदी असल्यामुळे त्याची पुर्ण कसर विद्यार्थ्यांनी पूर्ण केली आपल्या सुमधुर आवाजात एकापेक्षा एक अभंग सादर करत उपस्थितांची मने जिकंली.

